मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला (Shivsena) गारद केल्यानंतर भाजपने (BJP) आता माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) आणि पर्यायाने एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा लावल्याचे वृत्त आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये पाचव्या जागेसाठी टक्कर होत असली तरीही फडणवीसांच्या डोक्यात खडसेंचा ‘गेम’ ठरला आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रणनीतीचा ‘रिमोट’ स्वत:कडे घेतला आहे.
या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे ‘सेफ’ असल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच खडसेंच्या कोट्यात आपल्या पक्षाच्या मंत्र्यांसह प्रमुख आमदारांची मते देण्याची खेळी पवार यांची आहे. भरवश्याच्या आमदारांची मते खडसेंच्या पारड्यात देऊन खडसेंची आमदारकी पक्की करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. भाजपसह त्यांच्या साथीतील अपक्ष आमदारांना उपमुख्यमंत्री म्हणून पवार हे नेहमीच मदत करतात, त्याच्या परतफेडीपोटी दोन-चार आमदार पवारांचा शब्द खाली पडू देणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
फडणवीसांच्या डोक्यात खडसेंचा ‘गेम’ ठरलाय
पुढच्या राजकारणाची बांधणी करीत, अजित पवार हे एरवी पक्षापलीकडे जाऊन आमदारांना ‘बळ’ देत असल्याचा दिसून येते. अशांना गळाला लावून पवार हे आणखी एक डाव टाकू शकतात. नाईक-निंबाळकरांना भाजपमधून काही मदत होण्याची चर्चा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये पाचव्या जागेसाठी टक्कर होत असली तरीही फडणवीसांच्या डोक्यात खडसेंचा ‘गेम’ ठरला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचे गणित बिघडून कोणाला कसा फटका बसेल, याची हमी उरलेली नाही.
मात्र पवारांच्या खेळ्या भारी पडण्याची चिन्हे
मात्र, खडसेंना धोका झाल्यास पर्यायाने तो राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी धक्का मानला जाईल. हा धोका टाळण्याच्या हेतुने पवार यांनी गेल्या दोन दिवसांत विधान परिषदेची सारी सूत्रे आपल्याकडे घेऊन नवी रणनीती तयार केल्याचे समजते. ज्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. त्यामुळे खडसेंच्या पराभवासाठी महाविकास आघाडी त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मतांवर डोळा ठेवून डाव रचलेल्या फडणवीसांवर पवारांच्या खेळ्या भारी पडण्याची चिन्हे आहेत.
त्याचवेळी भाजप नेत्यांच्या कुरघोडीचा खेळ जवळून पाहिलेले खडसेही काही कमी नाहीत. भाजप सोडल्यानंतरही त्या पक्षातील जुन्या समर्थकांशी अजूनही संबंध जोडून असलेले खडेसेही भाजपची एक-दोन मते फोडू शकतात. भाजपमधील काही आमदारांना फोडण्याची जबाबदारी खडसे आणि नाईक-निंबाळकरांकडे अधिकृतपणे दिल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे खडसेंना आमदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपासून अजित पवार, जयंत पाटील आणि प्रमुख नेते हालचाली करीत असतानाही, खडसे स्वत:च्या पातळीवरही विजयासाठी झटत आहेत.
















