मेष : कामाच्या ठिकाणी चुका होऊ शकतात. वरिष्ठांची बोलणी ऐकावी लागतील. शांत व संयमी राहावे. मनोबल कमी असणार आहे. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. आज तुम्ही भविष्याबाबत थोडे चिंतेत अशाल. प्रवासात व वाहने चालविताना दक्षता घ्यावी. खर्च वाढणार आहेत.
वृषभ : कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालाल. भावंडांसोबत जुन्या आठवणी शेअर कराल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींना अचानक धनलाभ होणार आहे. आज कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. प्रवास सुखकर होतील. विविध लाभ होणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. शत्रूचे रुपांतर मैत्रीत होईल. तुम्हाला सावध राहावे लागेल.आरोग्य उत्तम राहील. विशेष प्रसन्नपणे कार्यरत राहणार आहात. प्रवास सुखकर होतील. आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. नोकरी, व्यवसायात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहाल.
कर्क : कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा प्लान कराल. नोकरीत काम करणाऱ्या लोकांना अंतर ठेवावे लागेल. नातेवाईक भेटणार आहेत. उचित मार्गदर्शन लाभेल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. आजचा दिवस प्रगतीसाठी असेल. जिद्दीने काम करणार आहात. आनंदी राहणार आहात.
सिंह : शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. शिक्षणातील अडचणी दूर होतील. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. आर्थिक कामांसंदर्भातील चर्चा सफल होईल.
कन्या : व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. विशेष उत्साही राहाल. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत.
तुळ : कामाचा खूप फायदा होईल. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांना सरप्राईज मिळेल. पार्टीचे आयोजन करु शकता. मनोबल कमी राहील. आज आपणाला कसली न कसली चिंता लागून राहणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. राजकीय क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस चांगला असेल. वाहने सावकाश चालवावीत. हितशत्रूवर मात करू शकणार आहात.
वृश्चिक : व्यवसायासाठी तुम्हाला कडूपणाचे गोडव्यात रुपातंर करावे लागेल. कला आत्मसात करावी लागेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. सन्ततिसौख्य लाभेल. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देईल. काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सल्लामसलत कराल.
धनु : सभोवतलाचे वातावरण प्रसन्न राहिल. कुटुंबातील सदस्याच्या लग्नासंबंधित निर्णय घ्याल. कुटुंबाचा सल्ला अवश्य राहिल. तुम्ही तुमचे वर्चस्व सिद्ध कराल. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. प्रवास सुखकर होतील. आज तुम्हाला पालकांकडून चांगली बातमी मिळेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आर्थिक कामे होतील.
मकर : आजचा दिवस चांगला जाईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. काही नवीन सार्वजनिक सभा घेण्याची संधी मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित असणारी सुसंधी तुम्हाला लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. तुमची फसवणूक होऊ शकते. व्यवसायात मिळणाऱ्या नफ्यामुळे थोडे नाराज असाल. काहींना अनपेक्षितपणे नातेवाईक भेटतील. आरोग्य सुधारेल.
कुंभ : जास्त धावपळ केल्याने आरोग्याकडे लक्ष देता येणार नाही. ज्यामुळे आजारपण वाढेल. मानसिक समस्या वाढतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. सध्या आपण ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करत राहावे. आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. संयमी राहावे. कामामध्ये चूक होण्याची शक्यता आहे.
मीन : आई-वडीलांचा आशीर्वादाने काम होतील. जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरु करा. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. तुमच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू मिळतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे.