चोपडा (प्रतिनिधी) चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत असणारे घुमावल येथे आमच्या उमेदवाराचे मत फोडले म्हणून एकास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
घुमावल येथील धनराज जगन्नाथ पाटील (वय ६५), यांना गावातील वसंत प्रेमराज पाटील, धनंजय वसंत पाटील, विशाल वसंत पाटील, देवानंद प्रेमराज पाटील, भुषण विश्वास पाटील यांनी धनराज जगन्नाथ पाटील यांनी गावातील मारुती मंदिर चौकात दि.23 रोजी दुपारी 11 वाजता मारहाण केली. मारहाणीचे कारण असे की, तु माझ्या पक्षाचे गावात मतदान फोडले व आमच्या उमेदवारास पाडले व ग्रामपंचायतीचे सुध्दा तु आमचे विरुध्द बिनविरोध सरपंच निवडुन दिले व विकास सोसायटीमध्ये सुध्दा बिनविरोध बॉडी आमचे विरुध्द निवडुन दिले. त्यादिवसापासुन तु आमच्या लक्षात आहे म्हणून आज तुला सर्वजण मिळून जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली व मारहाण केली.
या प्रकरणी चोपडा ग्रामिण पोलिस स्थानकात सी.सी.टी.एन.एस नं. २४२/२०२४ भा.न्या. सं कलम ११८(१).१८९(१), (२).१९१(२),१९०,११५(२),३५२,३५१(२) सह महा. पोलीस अधि. कलम ३७ (१), (३),१३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच जखमी धनराज जगन्नाथ पाटील यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चोपडा ग्रामीण पो.स्टेशन पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शना खाली पो.हे.का. नासीर तड़वी पो.नाईक विश्वनाथ गायकवाड हे पुढील तपास करीत आहे.