जळगाव (प्रतिनिधी) गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने खान्देश नाट्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभास जुन्या नव्या अशा एकूण 70 कलावंताचे आज एकत्रीकरण झालं. अनेक वर्षा नंतर एकत्रित झालेल्या कलावंतांनी गळा भेट घेत अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला.
प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून ज्या ज्या कलावंतांचा प्रतिष्ठान च्या कार्यास हातभार लागला त्या सर्व जेष्ठ रंगकर्मींचा यावेळी जेष्ठ रंगकर्मीं आणि नाट्य समिक्षक प्रा. राजेंद्र देशमुख सर तसेच जय भवानी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष . भानुदास पाटील, सचिव बाळकृष्ण पाटील, सह. सचिव रविराज पगार आणि महाजन यांच्या हस्ते उत्तमराव नेरकर, प्रमोद बाविस्कर, सुनंदाताई गवळी, अरुण सानप, संतोष पाटील, रविंद्र साळी, सोमनाथ सानप, अविनाश चव्हाण, योगेश शुक्ल, शाम जगताप, संजय निकुंभ, दुष्यंत जोशी पियुषभाई रावळ, सोनल कपोते, चंद्रकांत चौधरी मिलिंद देशमुख, अरुण साळुंखे, ओमप्रकाश शर्मा रवी पाटील या गुरूतुल्य सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी सत्कारार्थी योगेश शुक्ल यांनी खान्देश नाट्य प्रतिष्ठानचा इतिहास आणि आठवणी आपल्या शब्दातुन अधोरेखित केल्या. प्रमुख पाहुणे रविराज पगार यांनी जय भवानी शिक्षण मंडळाने सुरू केलेल्या विद्यालयातुन या देशातील शिक्षीत पिढी घडविण्याचे कार्य नाट्य वेड्या रंग कर्मींनी उभे केले. हे सांगत असताना एका विचाराचे पाच लोक जमले तर काय होऊ शकते. याचे उदाहरण देत. रंग कर्मींमधे उर्जा निर्माण केली. प्रा. राजेंद्र देशमुख सरांनी नाट्य वेडा माणूस साधारण असला तरी तोच असधारण कार्य करण्याचे धाडस दाखवु शकतो. कारण नाटक ही कला समृद्ध जीवन जगण्यासाठी समाज उजागर करणारे प्रभावी माध्यम आहे. असे सांगत सत्कार मुर्तींचे अभिनंदन केले.
यानंतर खान्देश नाट्य प्रतिष्ठानचे येत्या 2026 ला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री चिंतामण पाटील यांचा गौरव सोहळा दि. 16, सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्या संबंधी माहिती देत शरद भालेराव यांनी सर्व रंग कर्मींना आवाहन केले आहे. कि जी स्मरणीका खान्देश नाट्य प्रतिष्ठान तयार करणार आहे त्या साठी आपले लेख आपण 1 ऑगस्ट पर्यंत योगेश शुक्ल यांच्या सुपूर्द करावे.या नंतर अरुण सानप यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश सोनार, प्रदीप जाधव कु. एकता आसोदेकर यांनी परिश्रम घेतले.