धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला कुणी तरी पळवून नेले आहे. या तरुणीचे वर्णन रंगाने गोरी, शरीराने सडपातळ, उंची ४ फुट ३ इंच, अंगात आकाशी रंगाचा टॉप तर पांढऱ्या रंगाची पेन्ट परिधान केले आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या राहत्या घरातून दि ८ रोजी १० वाजता पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत.