धरणगाव (प्रतिनिधी) के.पी. मेकओव्हर ब्युटी पार्लरच्या संचालिका किरण पाटील यांना BWAI ब्युटी अवॉर्ड असोसिएशन ऑफ इंडियाज बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड २०२२, या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. गुजरातमधील (जावरा) सुरत येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यापुरस्कार प्रदान समारंभात स्टार प्लस टीव्ही चॅनलची कलाकार “गुम है किसी के प्यार में” कार्यक्रम मधील आशिया सिंग, ज्या सई या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील पष्टाणे येथील श्रीमती पाटील यांना जळगाव जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला. श्रीमती पाटील यांनी धरणगाव व संपूर्ण जळगांव जिल्ह्याचे नाव उंचावले आहे, श्रीमती पाटील यांच्या मित्रपरिवार, हितचिंतक आणि कुटुंबीयांनी अभिनंदन पाठवून उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.