मुंबई (वृत्तसंस्था) संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) फरार असल्याचा दावा केला आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत किरीट सोमय्या मुलगा नील सोमय्यासह फरार झाले असल्याचा दावा केलाय. तसेच हे दोघे मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत सोमय्यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, ”किरीट सोमय्या मुलासह फरार झाला आहे. न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की, हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोक्सी प्रमाणे पळून तर गेले नाहीत?”
मेहुल चोक्सी आणि सोमय्यांचं जुनं नातं आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मिळत नाही तोपर्यंत त्यांना लपवून ठेवण्यात आलं आहे. राजभवनानं काही चुकीचं काम केलं तर त्यांची वाचलेली इज्जत देखील जाईल. मुंबई पोलिस या ठगांना शोधून काढतील. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात यावी. किरीट सोमय्या आणि चौक्सी दोघांनी मिळून बिल्डरांकडून पैसे जमवले आहे. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी दिल्लीसोबत संपर्क साधून खोटे कागदपत्रं तयार केली आहेत. मेहुल चोक्सी जिथे आहे तिथे हे दोन्ही ठग गेले नाहीत ना? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.