TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव गोळीबार प्रकरण : आठ संशयितांना पोलिसांकडून अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कानळदा रोडवरील के.सी. पार्क परिसरात पैशांच्या वादातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी २७ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी परस्पर विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणात पोलीसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलतांना माहिती दिली.

पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरातील कानळदा रोडवरील के.सी. पार्क येथे शुभम अशोक माने हा आपला भाऊ मयूर माने आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खंडणीची मागणी आणि पैशांवरून मयूर माने याचा चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे याचे साथीदार असलेले तरूणांशी वाद होता. वाद सुरू होता. यापुर्वी तरूणांनी चिंग्याला जेलमधून सोडण्यासाठी पैशांची मागणी करत शिवीगाळ व धमकी दिली होती. त्यामुळे घाबरून शुभमने वेळोवळी फोन पे ने पैसे दिले होते. अजून पुन्हा पैशांची मागणी करण्यासाठी गुरूवारी २७ जुलै रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मयूर माने घरी असतांना सात ते आठ तरुणांनी घरावर दगडफेक करण्या सह अंदाधुंद गोळीबार करून पसार झाले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

दुसऱ्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील संत मिराबाई नगरात चेतन रमेश सुशीर हा आपल्या हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चेतनची मागील वर्षापासून शुभमसोबत ओळख आहे. सात महिण्यापूर्वी शुभम माने याने चेतनकडे उसनवार पैसे मागितले होते. जास्त पैसे मिळतील या उद्देशाने चेतन सुशीर आणि उमाकांत दत्तात्रय धोबी यांनी मिळून ८०हजार रूपये दिले. त्यानंतर चेतन आणि उमाकांत यांनी दिलेल्या पैशांची मागणी केली असता शुभम माने हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे चेतन सुशीर हा त्याचे मित्र लखन मराठे, लक्ष्मण शिंदे, नरेश शिंदे, समीर सोनार, बंटी बांदल यांना सोबत घेवून गुरूवारी २७ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता शुभच्या घरी आले. त्यावेळी पैशांची मागणी केली असता शुभमने शिवीगाळ केली. त्यानंतर आलेल्या तरूणांवर दोन वेळा गोळीबार केला. त्यानंतर सर्वजण जीव वाचवून पळत सुटले.

पोलिसात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. यात पहिल्या फिर्यादीनुसार लखन ऊर्फ गोलू दिलीप मराठे (रा. शिवाजी नगर, लक्ष्मण शिंदे रा. शिवाजी नगर), नरेश शिंदे रा. शिवाजी नगर, उक दत्तात्रय धोबी रा. संत मिराबाई नगर, जळगाव, समीर शरद सोनार रा. फारेस्ट कॉलनी जळगाव, राजेश उर्फ बंटी सदाशिव बांदली रा. उस्मानिया पार्क, जळगाव, चेतन रमेश सुशीर रा. मिराबाई नगर, जळगाव, चेतन सुरेश आळंदे उर्फ चिंग्या रा. तुकाराम वाडी, जळगाव आणि महेश मराठे रा. शिवाजी नगर हुडको, जळगाव यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर दुसऱ्या फिर्यादीवरून शुभम अशोक माने आणि मयूर अशोक माने दोन्ही रा. कानळदा रोड, जळगाव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी दोन्ही गटातील चेतन रमेश सुधीर, राजेश बांदल, उमाकांत धोबी, समिर सोनार, लक्ष्मण शिंदे, लखन शिंदे मयूर माने, शुभम माने या आठ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
Next Post

चोपडा महाविद्यालयात अभिरूप युवा संसद कार्यशाळेचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

October 26, 2020

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४२,४४६ कोरोनाबाधित, १,२०६ रुग्णांचा मृत्यू

July 10, 2021

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पुण्याला परतले ; महत्वपूर्ण साक्षीदारांचे नोंदवले जबाब !

October 15, 2021

धक्कादायक : अपघाताचा बनाव करत पाच लाखाचा तांदूळ विकला परस्पर !

February 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group