TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात अभिरूप युवा संसद कार्यशाळेचे आयोजन !

चोपडा महाविद्यालयात अभिरूप युवा संसद कार्यशाळेचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2023
in चोपडा, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा व युवक बिरादरी भारत, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा नेतृत्व विकास, युवाभूषण व अभिरूप युवा संसद’ या विषयावर दि. २७ व २८ जुलै या दरम्यान ‘दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे’ आयोजन स्मार्ट हॉल येथे करण्यात आले.

या दोन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील, कार्यशाळेचे प्रशिक्षक व युवक बिरादरीचे संचालक सचिन वाकुळकर तसेच युवक बिरादरीचे नीती कौन्सिल सदस्य डॉ. नागेंद्र रॉय, बिरादरीचे इतर सदस्य व प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी सौ. भारती सूर्यवंशी, मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे, मुख्याध्यापक एच. बी. मोरे, प्राचार्य सौ. ममता न्याती, समन्वयक आर. डी. साठे व इतर मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

या उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक एन. एस. सोनवणे यांनी केले तर प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, युवकांच्या शैक्षणिक विकासा सोबतच नेतृत्व विकास, कर्तृत्व विकास व दायित्व विकास होणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तुत कार्यशाळा महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले. या कार्यशाळेच्या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जे. एस. पाटील यांनी केले.
या दोन दिवसीय कार्यशाळेत एकूण ७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी करून सक्रिय सहभाग घेतला होता. अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करणारे जळगांव जिल्ह्यातील चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय हे पहिले महाविद्यालय ठरले आहे. या कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी प्रशिक्षक सचिन वाकुळकर यांनी युवक बिरादरी (भारत), मुंबई या संस्थेची माहिती देतांनाच या संस्थेकडून विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांविषयी माहिती दिली. तसेच ‘युवा नेतृत्व विकास, युवाभूषण व अभिरूप युवा संसद’ या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी दि. २८ जुलै रोजी डॉ. नागेंद्र रॉय यांनी अभिरूप युवा संसद स्पर्धेची संपूर्ण माहिती दिली. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकद्वारे युवा संसद स्पर्धेची तयारी कशी केली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या समारोप समारंभाप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्था व महाविद्यालय नेहमी तत्पर असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. एस. सोनवणे यांनी केले तर सुत्रसंचालन एस. आर. सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.

या कार्यशाळेच्या आयोजनासाठी डॉ. डी. डी. कर्दपवार, डॉ. बी. एम. सपकाळ, डॉ. पी. के. लभाने, डॉ. एच. जी. चौधरी, सौ. एस. बी. पाटील, किशोर खंडाळे, एस. जी. पाटील व बी. एच. देवरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
Next Post

स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्या स्मृतिदिनी ९० रक्तपिशव्यांचे संकलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव वासियांच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे स्वप्न साकार !

July 26, 2024

शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी संघटनेने ना. सावंत यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

September 18, 2020

रोटरी जळगाव ईस्टची नूतन कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सीए वीरेंद्र छाजेड, सचिवपदी प्रणव मेहता

July 3, 2021

आ. चंद्रकांत पाटलांकडून सोशल डिस्टेंसिंगचं उल्लंघन ; मंदिरात केली आरती, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

October 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group