बोदवड (महेंद्र पाटील) बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल व शिवसेना(शिंदे गट) यांच्यात सरळ लढत होती. यात राष्ट्रवादीचे शेतकरी विकासचे पॅनलने १८पैकी १७ जागांवर विजय मिळवला आहे. तर ग्रामपंचायत मतदार संघात सेनेकडून फेरमोजणी अर्ज दिला त्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे एक मत वाढीव निघाले आहे. ,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार
(विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघ विजयी उमेदवार व मिळालेली मते)
सुधीर रामदास तराळ ४९०, ,अंकुश राजेंद्र चौधरी ४८६, ,राजेंद्र सोनू फिरके ४६२, ज्ञानेश्वर अशोक पाटील ४८८, आसाराम नामदेव काजळे ४८६, किशोर वसंत भंगाळे ४६०, योगेश आत्माराम पाटील ४७७ दरम्यान, या विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात एकूण वैध मतपत्रिका ८०५ होते. त्यातील ७७ मतपत्रिका ह्या अवैध ठरवण्यात आल्या.
महीला राखीव मतदार संघ
आशाबाई भागवत टिकारे ४४६, जिजाबाई प्रविण कांडेलकर ४६०, महीला राखीव मतदार संघात वैध मतपत्रिका ८४७ होत्या तर अवैध ३५ मतपत्रिका ठरवण्यात आल्या.
इतर मागास वर्ग मतदार संघ
ईश्वर शंकरराव रहाणे ५३४, इतर मागासवर्गीय मतदार संघात वैध मतपत्रिका ८५२ होत्या तर अवैध मतपत्रिका ३०ठरवण्यात आल्या.
भटके विमुक्त जाती जमाती
विजय भावराव पाटील ५४१, भटके विमुक्त जाती जमाती मतदार संघात वैध मतपत्रिका ८५२ होत्या तर अवैध मतपत्रिका ३० ठरवण्यात आल्या.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ
रामभाऊ शंकर पाटील ४६९, दत्ता गणेश पाटील ४८७,ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघात वैध मतपत्रिका ९७१होत्या तर अवैध मतपत्रिका ४३ ठरवण्यात आल्या.
आर्थिक दुर्बल घटक
गणेश सिताराम पाटील ४८७, आर्थिक दुर्बल घटकातील मतदार संघात ९६१ वैध मतपत्रिका होत्या तर अवैध ५३ मतपत्रिका ठरवण्यात आल्या.
व्यापारी मतदार संघ
माणकचंद खुबचंद अग्रवाल १४६, अनिल मधुकर चौधरी ११२, व्यापारी मतदार संघात वैध मतपत्रिका १८८ तर एकही अवैध मतपत्रिका नव्हती.
हमाल मापाडी मतदार संघ
गोपाल संतोष माळी ५५ , या मतदार संघात वैध मतपत्रिका १०३ तर १ मतपत्रिका अवैध ठरवण्यात आली.
भाजप सेनेचे एकमेव विजयी उमेदवार
(भाजपा शिवसेना युतीच्या शेतकरी परिवर्तन पॅनल)
ग्रामपंचायत मतदार संघ
(अनुसुचित जाती जमाती राखीव)
जयपाल विरसिगं बोदडे ५०५-भाजप
पराभूत शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे
सोसायटी मतदार संघातून चौधरी विनायक चांदी ३०४, जवरे विश्वास राजाराम २९०,पाटील आंनदा मधुकर २८७,पाटील योगेश संतोष २७४,पाटील वैभव साहेबराव ३००,पाटील संजय भावराव ३०९, राणे वसंत एकनाथ २९५,
महीला राखीव मतदार संघातून पराभूत उमेदवार
खेवलकर मंगलाबाई समाधान ३२२,पाटील संगीता संतोष ३०४,
इतर मागास वर्ग मतदारसंघातून पराभूत उमेदवार
देशमुख आनदराव रामराव ३२८
विमुक्त जाती जमाती मतदार संघातून पराभूत उमेदवार
वंजारी अनिल प्रभाकर ३११
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून पराभूत उमेदवार
पाटील शरदराव माणिकराव ४५६, राणे पंकज अशोक ४५२
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून पराभूत उमेदवार
ऐदलाबादकर धनजंय सुरेश ४४८
आर्थिक दुर्बल घटकातील मतदार संघातून पराभूत उमेदवार
पाटील सुर्यकांत अभिमन्यू ४७२
व्यापारी मतदार संघातून पराभूत उमेदवार
जैन मनोज नथमल ७३, पाटील विनोद विठ्ठल ४३
हमाल मापाडी मतदार संघातून पराभूत उमेदवार
कोळी शांताराम रामकृष्ण ४४, असे परिवर्तन शेतकरी पॅनलचे उमेदवार पराभूत झाले आहेत.
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी मंगेशकुमार शहा, एम बी गाढे, तुषार चिंचोले,बाजार समिती सचिव विशाल चौधरी, इजहार शेख,अजित पाटील,योगेश सुर्यवंशी. यांच्या सह ४० कर्मचारी यांनी कामकाज पाहिले. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सपोनी अंकुश जाधव,पोहेकॉ शशिकांत शिंदे, मुकेश पाटील, नरेश नारखेडे यांच्यासह वरणगाव पोउनि प्रशांत दळवी व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.