जळगाव (प्रतिनिधी) आज दिवाळीच्या दिवशी सकाळी पूजेसाठी कोणताही मुहूर्त नाही. सायंकाळी 5 वाजल्यापासून लक्ष्मीपूजन करता येईल.
लक्ष्मी पूजेसाठी शुभ मुहूर्त
अमावस्या संध्याकाळी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राहील. मात्र 25 तारखेला सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त फक्त संध्याकाळ आणि रात्रीच राहणार आहे.
अशाप्रकारे करा दिवाळीची पूजा
1. पाण्याच्या कलशात गंगाजल मिसळा. ते पाणी स्वतःवर कुशाने किंवा फुलाने शिंपडून पवित्र व्हावे.2. पूजेत सहभागी असलेल्या लोकांना आणि स्वतःला गंध लावून पूजा सुरू करा.3. प्रथम श्रीगणेश, नंतर कलश, नंतर सर्व देवी-देवतांची स्थापना करा आणि शेवटी लक्ष्मीची पूजा करा.