मेष : रागाच्या भरात चुकीचे शब्द वापराल. सावध रहा. प्रत्येक दिवस नव्या विचारांचा, भेटीचा ठरेल. नोकरीत प्रभाव वाढेल. आपले आरोग्य उत्तम असणार आहे. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. धंद्यात चर्चा जपून करा. लाभ, वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील संघर्ष कमी होईल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
वृषभ : धंद्यात वाढ, लाभ होईल. घरगुती कामे वाढतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक तणाव वाढवू नका. समस्या मोठी करू नका. काहींना दुपारनंतर अनपेक्षित धनलाभ संभवतो. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. समस्या मोठी करू नका. योग्य मुद्दा नम्रपणे मांडा. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असल्याने कामे यशस्वी होणार आहेत. काहींना गुप्तवार्ता समजतील.
मिथुन : मनाप्रमाणे घटना घडतील. कायद्याला धरून कोणतेही वक्तव्य करा. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. दुपारनंतर आपले मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. नवीन परिचय मनस्ताप देणारा ठरेल. नोकरीतील तणाव दूर कराल. धंद्यात फसगत टाळता येईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.
कर्क : क्षुल्लक गोष्टीवर मान-अपमानाचा विचार संताप वाढवणारा असेल. नोकरीत वरिष्ठांना मदत कराव लागेल. मानसिकता सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला एखादा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. धंद्यात स्मितहास्य फायदेशीर ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निरीक्षण करा. महत्त्वाची कामे आज नकोत. दुपारनंतर काही अनावश्यक खर्च संभवतात.
सिंह : सप्ताहाच्या सुरूवातीलाच करा. तुमच्या बुद्धिचातुर्याचे कौतुक होईल. नोकरीधंद्यात नम्रता ठेवा. दुपारनंतर अनपेक्षित गाठीभेटी पडतील. प्रियजनांशी झालेला सुसंवाद एखादा सुखद अनुभव देईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्रीची भाषा करतील. काहींना विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामे होतील.
कन्या : आर्थिक व्यवहारातील अडचणी कमी होतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. नोकरीधंद्यात लाभ, वाढ होईल. नोकरी व व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लावता येणार आहेत. ज्ञानात भर पडेल. मानसन्मान मिळेल. नवीन जबाबदारी दिली जाईल. घरातील कामे करून घ्या. कामाचा ताण जाणवणार आहे. काहींना सार्वजनिक कार्यात मान-सन्मान लाभेल.
तुळ : परिचय लाभदायक ठरेल. नोकरीधंद्यात प्रगतीकडे वाटचाल होईल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. दुपारनंतर आपणाला काही सुखकारक अनुभव येतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना गोड बोलून शह देऊन स्वतचे ध्येय गाठता येईल. काहींना दुपारनंतर अनपेक्षित प्रवास संभवतो. मनोबल उत्तम राहील.
वृश्चिक : रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात काळजी घ्या. दुखापत टाळा. नोकरीत काम वाढले तरी वर्चस्व राहील. दैनंदिन कामात दुपारनंतर अडचणी जाणवतील. मानसिक स्वास्थ्य कमी असणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याला धरूनच मुद्दे मांडा. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी.
धनु : बोलण्यात गोडवा ठेवा. रागाने नुकसान होईल. नोकरीत दगदग होईल. कामाचा ताण जाणवणार आहे. दुपारनंतर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काही व्यक्ती टीकात्मक चर्चा करतील. स्वतच्या कार्यावर भर द्या. लोकप्रियता टिकवा. कामाचा उरक वाढेल. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडेल.
मकर : अनाठायी खर्च टाळा. नोकरीत सहकारी, मित्र गैरफायदा घेतील. धंद्यात मोह नको. लाभ होईल. दुपारनंतर दैनंदिन कामाचा ताण जाणवणार आहे. मानसिक स्वास्थ्य कमी असणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक कामांची गर्दी होईल. महत्त्वाचे काम करण्याची संधी मिळेल. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाणार आहे.
कुंभ : उत्साह, आत्मविश्वास वाढेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यातील धोरण योग्य राहील. कठीण कामे करून घ्या. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहे. नोकरी, व्यवसायात कामे पूर्ण होणार आहेत. गुंतवणूक योग्य करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संधी मिळेल. वरिष्ठ तुमचे विचार ऐकून घेतील. आर्थिक लाभ होतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
मीन: तुमच्या जिद्दी, प्रयत्नवादी वृत्तीमुळे तुम्ही अग्रेसर राहाल. जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होतील. मानसिक त्रास कमी होईल. आनंदी वातावरण राहणार आहे. योग्य मुद्दा नम्रपणे मांडा. वरिष्ठांचा दबाव राहील. काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येणार आहे. अहंकार न ठेवता प्रेमाने वागा. तुमची कामे करून घेता येतील. सार्वजनिक कामात तुमचा उत्साही सहभाग राहील.