धरणगाव (प्रतिनिधी) रिक्षाचालक फोन वर बोलताना रिक्षा रस्त्याखाली उतरून पलटी झाल्याने एक जण जागीच ठार तर अन्य पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना अमळनेर-पारोळा रस्त्यावर खोकरपाट फाट्याजवळ घडली. निवृत्ती कैलास जाधव असे मृताचे नाव आहे.
पारोळ्याहून पॅजो रिक्षा ही अमळनेर येत असताना खोकरपाट फाट्यावर रिक्षाचालक फोनवर बोलत होता. त्याचे दुर्लक्ष झाल्याने रिक्षा रस्त्याच्या खाली उतरली. यातच पुढच्या चाकाला दगड आडवा आल्याने रिक्षा उलटली. या अपघातात निवृत्ती जाधव हे ठार झाले तर पाच प्रवाशी जखमी झाले आहेत.