TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी मंगळ ग्रह मंदीराचा उपक्रम स्तुत्य : अशोक जैन !

जैन हिल्स येथून शेतकरी जनजागृती रथ उपक्रमास आरंभ !

vijay waghmare by vijay waghmare
May 17, 2024
in अमळनेर, कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदीर संस्थान उपक्रम स्तुत्य आहे, या उपक्रमासाठी मी जैन इरिगेशनच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. मंगळग्रह सेवा संस्था, व तालुकात कृषि कार्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळ कृषी जनजागृती रथ यात्रेचे उद्घाटन आज जैन हिल्स येथे कृषि पर्यटन दिनाचे औचित्य साधून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुरबार तडवी यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

मंगळ ग्रह मंदीर संस्थानच्यावतीने गत पाच वर्षांपासून कृषी क्षेत्र जागर रथाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी मंगळ ग्रह मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ.डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, विनोद कदम, अभियंता संजय पाटील, जी. एस. चौधरी, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, आर. टी. पाटील, एम. जी. पाटील, ए. डी. भदाणे, सुनील गोसावी, निलेश महाजन, रवींद्र बोरसे, विशाल शर्मा, आशिष चौधरी, जे. व्ही. बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी उपक्रमाचे महत्त्व विषद केले, तर मंगळ ग्रह मंदिराचे पुरोहीत प्रसाद भंडारी यांनी रथाचे विधीवत पूजन केले.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

शेतकऱ्यांच्या जनजागृती रथ उपक्रमांतर्गत अमळनेर तालुक्यातील १५४ गावांसाठीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे कारण म्हणजे खरीप हंगाम २०२४ पूर्वी शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठा खरेदी केल्या जातात. त्यात त्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यांची फसवणूक टळावी, जागृती यावी, यासाठी त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबची शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध, वास्तव माहिती प्राप्त होणार आहे.

‘भारतातील ऐतिहासिक अशा देवभूमी अमळनेर येथे मंगळ ग्रहाचे मंदीर आहे. त्या मंदीरामार्फत निरनिराळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलं जातं. धर्म-ज्ञान हे तर त्यांचं क्षेत्रच आहे. ते त्यांचे प्राथमिक, मुख्य काम असले तरी समाजातील वेगवेगळ्या वर्गाला जन जागृतीच्या माध्यमातून ते त्यांच्या प्रश्नांना हात घालायचा प्रयत्न करतात. थेट लोकांपर्यंत जनजागृती भिडते, त्यातून एक चांगला संदेश पोहोचतो व त्यानुसार लोक मार्गक्रमण करत असतात. त्याच कडीमध्ये आपल्या मंगळ ग्रह मंदिराच्या मार्फत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी रथ काढतात. त्या रथ यात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो. शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामकाजात या ज्ञानाचा वापर करतात. जेणे करून त्यांचे नुकसान होणार नाही व उत्पादनही वाढेल. या उपक्रमात अमळनेर कृषि विभागानेही मोलाची साथ दिलेली आहे. या उपक्रमास शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षापासून या सोबत शेती आणि शेतकरी तसेच जैन इरिगेशन हे जे अतूट नाते आहे या उपक्रमात जैन इरिगेशनलाही सोबत घ्यावे. या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती व उच्च तंत्रज्ञान ही पोहोचवू. जेणे करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच माझ्यासाठी मोठे पारितोषिक असे जैन इरिगेशनचे संस्थापक आमचे वडील भवरलालजी जैन म्हणत असत. सर्व मिळून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करून या…!’

अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन जळगाव.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAshok Bhau JainJain irrigation

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

नांदेडमध्ये महाप्रसादातून ११४ भाविकांना विषबाधा, १२ जण गंभीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर येथील जानवे आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात

March 8, 2021

प्रेयसीला लावला फोन अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात ; बनवाबनवी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक !

April 4, 2023

भुसावळात सापडले गावठी कट्ट्याचे मॅग्झीनसह तीन काडतूस !

July 2, 2022

राज्यसभा निवडणूक : गिरीश महाजनांच्या स्वीय सहाय्यकाने लावलेल्या पैजेची राज्यभर चर्चा !

June 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group