जळगाव (प्रतिनिधी) मजुरीमध्ये दरवाढ व्हावी याकरता उत्तर महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेतर्फे आजपासून भारत पेट्रोलियम एमआयडीसी येथे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये मजुरीची कोणतीही दरवाढ न झाल्यामुळे या कामगारांनी सिलेंडर लोडिंग अन् लोडिंगचे काम बंद केले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनामध्ये तीन महिन्यापूर्वी बैठक होऊन दरवाढ देणे बाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र त्या चर्चेला केराची टोपली दाखवण्याचं काम वाहतूक ठेकेदारांतर्फे करण्यात येत आहे. जोपर्यंत दरवाढीचा निर्णय होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील अशी माहिती उत्तर महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष अँड.जमील देशपांडे यांनी सांगितले आहे.