अमळनेर(प्रतिनिधी) : येथील साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरांची पतपेढी येथे शिवधर्म पध्दतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले.पूजनासाठी स्वराज्य संकल्पिका जिजाऊ माँ साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,माता रमाई तसेच धनलक्ष्मी यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.पतपेढीचे अकाऊंट बुक,कॅश बुक,पोटकिर्द,लेजर बुक,डे बुक आणि कापूस भरलेली प्रतिकात्मक बैलगाडी, मातीच्या पाच सुगडांमधे पाच प्रकारचे धान्य भरून त्यात छोटे कापडी भगवे झेंडे रोवले होते.
विज्ञान युगात प्रगतीसाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.सशक्त मेंदूसाठी वाचन आवश्यक आहे.आपला इतिहास आपणच लिहावा, म्हणजेच पिढीला लिहिते करणे आवश्यक आहे म्हणून पूजेसाठी लॅपटॉप, ग्रंथ, लेखणी असे साहित्य ठेवून विधीवत पूजा करण्यात आली.प्रथम जिजाऊ वंदना गायिली गेली.तसेच मानव कल्याणासाठी मंत्रोच्चार करून मां जिजाऊंची आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.पुजाविधी पतपेढीच्या खजिनदार वसुंधरा लांडगे यांनी केला.याप्रसंगी पतपेढीचे अध्यक्ष सचिन साळुंखे, उपाध्यक्ष राजू पाटील,मानद सचिव तुषार बोरसे, संचालक आर.बी.पवार,आर.बी.पाटील,जे.एस.पाटील तसेच नगरसेवक श्याम पाटील,प्रा.डाॅ.लिलाधर पाटील, रणजित शिंदे, ईश्वर महाजन दशरथ लांडगे, व्यवस्थापक सागर पाटील उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविंद्र पाटील,अजय पाटील, स्वप्निल पाटील,विपिन पाटील यांनी परिश्रम घेतले.