जळगाव (प्रतिनिधी) महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पहिल्या महासभेसाठी जाण्यापूर्वी जागतिक परिचारिका दिनानिमित्त आज (१२ मे २०२१) सकाळी दहाच्या सुमारास सिंधी कॉलनीतील महापालिकेच्या कै. चेतनदास मेहता रुग्णालयास भेट दिली.
यावेळी डॉ. सुजाता पाटील व डॉ. ठुसे यांनी महापौर, उपमहापौरांचे स्वागत केले. त्यानंतर महापौर सौ. जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तेथील कर्मचार्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले व जागतिक परिचारिका दिनाचे महत्त्व सांगणारे फलक रुग्णालयात लावण्यासाठी भेट दिले.
तसेच शोभा कोगटे, हर्षदा शिलेदार, ममता बोदडे, अनिता भदाणे, शबिरा तडवी, लक्ष्मी सरघटे, सुरेखा वडनेरे, मीरा चंडाळे आदी परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या व सर्वांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. महापौर-उपमहापौरांकडून करण्यात आलेल्या या छोटेखानी सत्कारामुळे परिचारिकांनी समाधान व्यक्त केले.