जळगाव (प्रतिनिधी) गांधी विचार संस्कार श्रृंखलेअंतर्गत गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे १२ वी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी १४ ते १७ जुलै २०२१ या दरम्यान ऑनलाईन शिबीर आयोजित करण्यात आले. आजच्या औपचारिक उद्घाटनात गुजरात विद्यापीठ, अहमदाबादचे पूर्व कुलगुरू, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी ‘माझ्या व्यक्तिमत्व विकासात महात्मा गांधी कुठे मदत करु शकतात’ या विषयावर सुसंवाद साधला.
या ऑनलाईन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे २०० हून अधिक शिबिरार्थींनी नोंदणी केली आहे. या शिबिरास सहभागी होण्यासाठी https://forms.gle/t2FSEWWWpBhB9aNLA लिंकवर आधी नोंद करणे आवश्यक आहे.
कोविड आव्हानात्मक परिस्थितीत देखील गांधी रिसर्च फाउण्डेशनतर्फे या पूर्वी ऑनलाईन विविध शिबीर घेण्यात आलेले आहेत. गांधी विचार संस्कार श्रृंखलेअंतर्गत १२ वी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सकाळी ८ ते ९.४५ दरम्यान खास ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात १५ जुलै रोजी सकाळी ८ वाजता ‘महात्मा गांधी – समज-गैरसमज’ या विषय़ावर वडोदरा येथील डॉ. विरल देसाई सुसंवाद साधतील. या शिबिराच्या समारोपात १७ जुलै २०२१ ला महात्मा गांधीजींचे पणतू मा. तुषार गांधी यांचा मुक्त संवाद होईल. अधिक माहितीसाठी गांधीतीर्थ, जैन हिल्स, जळगांव – 425001. संपर्क क्रमांक – 9404955220 येथे संपर्क साधता येईल.