चोपडा (प्रतिनिधी) रक्षाबंधन सणानिमित्त सालाबादप्रमाणे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या बहिणींच्या हाताने चोपड्यात राखी बांधून घेतली. सुंदरी येथील निर्मलाबाई देशमुख व गणेश कॉलनी भागात सुशीलाबाई गुर्जर या दोन्ही बहिणीची त्यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी धरणगाव येथील सेनेचे उपजिल्हाप्रमुख मोतीलाल पाटील, गुर्जर समाजाचे नेते नवलसिंग पाटील, शिवसेना शहरप्रमुख आवा देशमुख, पालकमंत्री पाटील यांचे मेव्हणे नारायण देशमुख, माजी नगरसेवक महेश पवार आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी राज्यात अनेक भागात पाऊस नसल्यामुळे कॅबिनेटमध्ये दुष्काळाच्या घोषणेची शक्यता असल्याचे सांगितले.