TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कृषी वीजबिल सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हा ; मुख्य अभियंता कैलास हुमणे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 12, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणतर्फे देण्यात येणाऱ्या भरघोस सवलतीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कृषिपंपांचे संपूर्ण वीजबिल भरून थकबाकीमुक्त व्हावे आणि स्थानिक विद्युत यंत्रणेच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले.

एरंडोल तालुक्यातील विखरण गावात झालेल्या ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास ६६ टक्के सवलत दिली जात आहे. कृषी वीजबिलाच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कमदेखील माफ करण्यात येत आहे, असे हुमणे म्हणाले. तसेच थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शासनाने विलासराव देशमुख अभय योजना सुरू केली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन महावितरण कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन हुमणे यांनी केले. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे, कक्ष अभियंता लक्ष्मी माने यांची उपस्थिती होती.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची वीजबिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करावे व या योजनेचा लाभ सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना करून देण्यासाठी जिल्ह्यात विविध गावांत कृषी ग्राहकांच्या वीजबिल दुरुस्ती संदर्भात शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये ग्राहकांचा मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे. कृषी ग्राहकांच्या वीज बिल दुरुस्तीचे प्रस्ताव महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करुन देयक दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाला तात्काळ कळविण्यात येत आहे. या शिबिरांचा कृषी ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार कृषी वीजबिलांच्या चालू व थकीत बिलांच्या भरण्यामधील ६६ टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (३३ टक्के) आणि जिल्हा स्तरावर (३३ टक्के) कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठ्यासह स्थानिक वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे.

जळगाव परिमंडलात आतापर्यंत १ लाख ८२ हजार ५८३ शेतकऱ्यांनी कृषिपंपाचे १८५ कोटी ३४ लाख रुपये वीजबिल भरून योजनेत सहभाग नोंदवला आहे. सुधारित थकबाकीमध्ये ५० टक्के माफी मिळविण्याची संधी केवळ येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत असल्याने शेतकऱ्यांनी बिल भरून थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

धक्कादायक ! दारुची सवय सोडवण्यासाठी बहीण मारायची टोमणे ; भावाने बहिणीची गोळी घालून केली हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन

December 29, 2020

प्रेयसीचा खून करून प्रियकर पसार ; आईच्या घरासमोरच ठेवला मुलीचा मृतदेह !

September 12, 2024

फडणवीस आक्रमक ; काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांविरोधात थेट हक्कभंग दाखल

March 10, 2021

बोदवड येथे आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अग्निशमन बंब, घंटागाडी, ट्रॅक्टरचे लोकार्पण !

August 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group