जळगाव (प्रतिनिधी) महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (म.) जळगाव या कार्यालयामार्फत सफाई कर्मचारी/सफाई कर्मचारी कुटूंबातील अवलंबीत लाभार्थ्यासाठी जिल्हा कार्यालयात प्रलंबित कर्ज प्रकरणांसाठी योजना राबविण्यात येणार आहे. अशी माहिती के. जी. जोपळे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जळगाव यांनी दिली आहे.
महामंडळाच्या ४३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १४ ते ३० जुलै, २०२१ या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महामंडळाच्या mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे. असेही जोपळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.