नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एक आठवड्याच्या लॉकडाऊननंतरही पॉझिटिव्हिटी दर सर्वाधिक राहिल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊन वाढवला असून १७ मे रोजी सकाळी पाच वाजता संपेल. दिल्लीतील मेट्रोसेवेही बंद ठेवण्यात आली आहे.
दिल्लीत गेल्या १९ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीन वेळा हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. उद्या १० मे रोजी हा लॉकडाऊन संपणार होता. मात्र कोरोना स्थिती पाहता हा लॉकडाऊन आणखी आठवडाभर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत २३ ते ३५ टक्क्यांनी घट झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं.
राजधानी दिल्लीत शनिवारी १७ हजार ३६४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. करोनामुळे ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १९ हजारांच्या पार गेला आहे. सध्या दिल्लीत ८७ हजार ९०७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.