नवी दिल्ली (प्रतिनिधी) लोकसभेच्या निवडणुका या सात टप्प्यात होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिताही लागू झालेली आहे.
देशात ७ टप्प्यांत निवडणूक होईल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान होवून ४ रोजी निकाल लागेल. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल. 26 एप्रिलपासून, 7 मे, १३ मे, २० मे, २५ मे रोजी मतदान असेल तर ४ जूनला मतमोजणी होईल, अशी माहिती केंद्रीय निवडणुक आयुक्तांनी दिली आहे. आयोगाकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणेच देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे.
पहिल्या टप्पा -19 एप्रिल
दुसऱ्या टप्पा – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 25 मे
सातवा टप्पा – 1 जून
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल
26 एप्रिल
7 मे
13 मे
20 मे
25 मे
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचीही घोषणा
आंध्र प्रदेशमध्ये 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 13 मे रोजी मतदान होणार आहे. अरुणाचल 20 मार्च अधिसूचना, 19 एप्रिल रोजी मतदान. सिक्कीम 19 मार्चला अधिसूचना, 20 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ओडिशात दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्याची अधिसूचना 29 एप्रिलला तर दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना 7 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. 25 मे आणि 1 जून रोजी मतदान होणार आहे.
26 विधानसभांच्या पोटनिवडणुका होणार !
निवडणूक- 26 विधानसभांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, हिमाचल, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. 26-26 रिक्त पदे भरण्यात येत आहेत. हे लोकसभेच्या निवडणुकांसोबत होतील.