धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव येथील पूर्वापार पासूनचे ग्रामदैवत श्री मरीआई मंदिराच्या जिर्णोद्धारानिमित्त मरीआई मंदिर संस्थान व जागृती युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य भंडाऱ्याच्या निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. या पावन प्रसंगी सुमारे १५ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण मरीमाता परिसर भक्तिमय व श्रद्धेच्या वातावरणाने भारावून गेला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी धरणगाव नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाबाई सुरेश चौधरी, उपनगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन तसेच नगरसेवक व नगरसेविकांच्या शुभहस्ते विधीवत पूजन व भव्य महाआरती संपन्न झाली. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील सेवेकऱ्यांनी सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ वाचन करून उपस्थित भाविकांना अध्यात्मिक ऊर्जा प्रदान केली.
यानंतर महाप्रसादास प्रारंभ करण्यात आला. महाप्रसादामध्ये वरण – भात – पोळी, शिरा व मटकी भाजी असा सात्त्विक व स्वादिष्ट प्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला. उत्कृष्ट नियोजन, स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध कार्य व सुरळीत व्यवस्थेमुळे महाप्रसाद वितरण शांततेत व अतिशय सुरळीतपणे पार पडले.
या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमास शिवसेनेचे उपनेते गुलाबरावजी वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भगवान महाजन, व्ही. टी. माळी, रामकृष्ण महाजन, सोमनाथ महाजन, शिवाजी देशमुख, माधवराव पाटील, कडू महाजन, राजेंद्र महाजन, पांडुरंग मराठे, दिलीप पाटील, गणेश पाटील, डॉ.रमेश कट्यारे,नगरसेविका कविता पाटील, ज्योती पाटील, भारती महाजन,हेमांगी अग्निहोत्री, प्रमिला शिरसाठ,नगरसेवक विलास महाजन, भागवत चौधरी, विजय महाजन, विनय भावे, परमेश्वर महाजन , सुनिल चौधरी, निलेश चौधरी, कडुसिंग बयस, हेमंत महाजन, किरण अग्निहोत्री यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मरीआई मंदिर संस्थानचे अध्यक्ष किशोर महाजन, उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी जागृती युवक मंडळाचे पदाधिकारी, समस्त माळी समाज, कुणबी पाटील समाज, मराठे समाज, श्री सावता माळी समाज सुधारक मंडळ (मोठा माळीवाडा), तिळवण तेली समाज आदी विविध समाजांचे अध्यक्ष व पंचमंडळ यांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.
महाप्रसादासाठी लागणारी सर्व भांडी श्री सावता माळी समाज सुधारणा मंडळ, मोठा माळीवाडा यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमासाठी आवश्यक संपूर्ण पिण्याचे पाणी कृपा ॲक्वा, नमो आदेश ॲक्वा व चव्हाण ॲक्वा व ईश्वर सोनार यांच्या वतीने मोफत पुरवण्यात आले. पाणी वाटपाची सेवा श्री नरेंद्रचार्यजी महाराज भक्त परिवाराने निस्वार्थपणे पार पाडली.
कार्यक्रमाचे प्रभावी व शिस्तबद्ध सूत्रसंचालन ह.भ.प. श्री आर. डी. महाजन सर, लक्ष्मणराव पाटील व रमेश चौधरी यांनी केले. देणगी स्विकारण्याची जबाबदारी आर पी पाटील सर, गुलाब महाजन, चैत्राम महाजन व संजय पवार यांनी समर्थपणे पार पाडली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मरीआई मंदिर संस्थान, जागृती युवक मंडळ, लहान माळीवाडा मित्र मंडळ, नवेगाव मित्र मंडळ, भगवा ग्रुप, नाथभक्त परिवार, जय भवानी नगर मित्र मंडळ, विविध समाज संघटना, व्यापारी बांधव व दानशूर नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. मंदिर जिर्णोद्धाराच्या उर्वरित कामांसाठी भाविकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले. तत्पूर्वी भंडाऱ्याच्या आदल्या रात्री श्री.मरीआई माता मंदिरात धार्मिक भजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. भजन, नामस्मरण व हरिपाठामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते. आई मरीमातेच्या कृपेने सर्वांवर सुख, शांती व समृद्धी नांदू दे;अशी सामूहिक प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली.














