पाटणा (वृत्तसंस्था) पक्ष बैठकीत बोलताना तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे. नितीश कुमारच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बिहारमध्ये एनडीएच सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु असताना तेजस्वी यादव यांनी मात्र महागठबंधन सरकार स्थापन होईल असं सांगत आमदारांना तयार राहण्याचा आदेश दिला आहे.
पक्ष बैठकीत बोलताना तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि महागठबंधनचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांना पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याची विनंती केली आहे. बिहारमध्ये सत्ता महागठबंनचीच येणार, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी आज महागठबंधनच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत तेजस्वी यादव यांनी आमदारांना संबोधित केलं. बिहारमध्ये भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मात्र, खातेवाटपावरुन एनडीएतील घटकपक्षांमध्ये बिनसलं तर त्याचा लगेच फायदा घ्यायचा, अशी तेजस्वी यादव यांची रणनिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तेजस्वी यादव यांनी आज निकालावर प्रतिक्रिया दिली. “परिणाम आणि निर्णय या दोन गोष्टींमध्ये फरक असतो. निवडणुकीचे परिणाम त्यांच्या बाजूने तर निर्णय आपल्या बाजूने आहे”, असं तेजस्वी यादव आमदारांना म्हणाले.