मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता होती. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यानुसार राज्याचा १२ वी निकाल ९९.६३ टक्के लागला आहे.
दरवर्षीच्या निकालाप्रमाणेच यंदाही दहावी आणि बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. विशेष म्हणजे यंदा विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यास घरूनच करावा लागला होता. कोरोनामुळे पूर्व जुनिअर कॉलेज आणि शाळा बंद असल्यामुळे परीक्षाही होऊ शकली नाही. मात्र तरीही मुलीच अव्वल ठरल्या आहेत. यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. विद्यार्थीनीचा निकाल ९९.७३ टक्के इतका आहे तर विद्यार्थ्यांचा निकाल ९९.५४ इतका आहे. म्हणजेच ०.१९ टक्क्यांनी मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल यंदा ९९.६३ टक्के लागला आहे. यंदा राज्यातील एकूण १३ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली.
या विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात करण्यात आली होती. यंदा विज्ञान शाखेचा ९९.५५ टक्के निकाल लागला आहे. कला शाखेचा ९९.८३ टक्के तर वाणिज्य शाखेचा ९९.९१ टक्के निकाल लागला आहे.
















