TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जुन्या पेंशनसाठी राज्यव्यापी “बाईक रॅली” आंदोलनात महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन) होणार सहभागी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

अमळनेर (प्रतिनिधी) : राज्यातील 1 नोव्हें.2005 रोजी व त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शासकीय,निमशासकीय व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी याना NPS ऐवजी जुनी पेंशन योजना (OPS)लागू करण्यात यावी.या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने बुधवार दि.21 सप्टें.2022 रोजी “राज्यव्यापी बाईक रॅली”चे आयोजन करण्यात आलेले आहे. या विषयी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय व मुख्यसचिव यांना समन्वय समितीच्या वतीने दि.25 ऑगस्ट 2022 रोजी पत्र देण्यात आलेले आहे.
तसेच समन्वय समितीच्या पत्राधारे राज्यातील सर्व खाजगी मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांनी दि.21 सप्टें.22 च्या “राज्यव्यापी बाईक रॅली”आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होऊन आंदोलन 100%यशस्वी करण्यासंबंधी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)च्या वतीने सर्व संबंधित शहर/जिल्हा संघटनांना आवाहन करणारे पत्र दि.15 सप्टें.2022 रोजी पाठविण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील 1 नोव्हें.2005 रोजी वा त्यांनंतर सेवेत दाखल सर्व शासकीय/निम शासकीय व शिक्षक/कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू करावी या मागणीच्या पूर्ततेसाठी राज्यातील संघटनांकडून अनेकवेळा सातत्यपूर्ण सनदशीर आंदोलने करण्यात येत आहेत.राज्याचे मा.अर्थराज्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर विचारविनिमय करण्यासाठी 19 जाने.2019 रोजी”अभ्यास समिती”गठीत करण्यात आली. मात्र सुमारे 3 वर्षानंतरही सकारात्मक प्रगती दिसून आलेली नाही.
एव्हढेच नव्हे तर,DCPS/NPS धारकांकडून दरमहा जमा होणाऱ्या वेतनाच्या 10% +शासन हिस्सा 14% वर्गणी व त्यावरील व्याज या रकमेचे विवरण संबधित शिक्षक व कर्मचारी यांना देण्यात आलेले नाही.तसेच या योजनेतील अनुस्यूत फंड मॅनेजर कडून प्रस्तावित गुंतवणूक यासंबंधी वर्गणी भरणा करणाऱ्या शिक्षक/कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास शासन कमालीचे उदासीन दिसून येत आहे.त्यामुळे DCPS/NPS योजनेच्या प्रशासकीय आंधळ्या प्रक्रियेत कोट्यवधी रक्कम “रामभरोसे”जमा होत असल्याचे दिसून येत आहे. कारण PFRDA कायद्यान्वये DCPS/NPS खात्यावरील दरमहा जमा एकूण 24% रक्कम पुढील उचित गुंतवणुकीसाठी फंड मॅनेजरकडे सुमारे 10,000 कोटी पेक्षा अधिक रक्कम देणे थकीत असल्याचे सूत्रांकडून समजते.ही बाब राज्यातील DCPS/NPS धारक शिक्षक कर्मचारी यांच्या भवितव्याशी शासन पुरस्कृत “जीवघेणा खेळ”सुरू आहे की काय?असा गंभीर प्रश्न यातून निर्माण होत आहे. यामुळे शिक्षक कर्मचारी यांचा उत्तरायुष्यातील जीवनाधार धोक्याच्या कडेलोट पातळीवर आहे.म्हणून राज्यातील शिक्षक/ कर्मचारीयांच्यामध्ये या योजनेविषयी कमालीचा असंतोष व चीड आहे.लोक कल्याणकारी प्रगतीशील व पुरोगामी म्हणवणाऱ्या आपल्या राज्यात शिक्षक/कर्मचारी यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निश्चित हमी देणारी “जुनी पेंशन योजना”लागू करण्यासंबंधीची उदासिनता धोकादायक व धक्कादायक आहे.शिवाय या विषयावर वेळोवेळी अनेक आंदोलने सतत होत असूनही शासनस्तरावरील कर्णबधीर उदासीनता पेन्शनच्या सामाजिक प्रश्नांकडे शासनाच्या प्राधान्यक्रमाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. महाराष्ट्रापेक्षा सिमीत प्रगती व संसाधने असलेल्या छत्तीसगड,गोवा आदि राज्यांनी NPS ऐवजी जुनी पेंशन(OPS)लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.राज्यातील आमदार-खासदार यांना NPS योजना लागू न करता केवळ शिक्षक कर्मचारी यांना लागू करणे अन्यायकारक आहे. म्हणून राज्यातील सर्व शिक्षक/कर्मचारी यांना NPS ऐवजी 1982 ची पेंशन व प्रॉव्हिडंट फंड योजना(OPS)लागू करण्यात यावी.यासाठी या योजनेतील जमा वर्गणी रक्कम शिक्षक/कर्मचारी यांच्या नवनिर्मित प्रो.फंड खात्यावरील “आरंभीची शिल्लक” म्हणून NPS कडून वळती करून घ्यावी.अशी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)मागणी करीत आहे.
आवाहन
बुधवार दि.21 सप्टें.2022 रोजी आयोजित”राज्यव्यापी बाईक रॅली”आंदोलनात स्थानीय जिल्हा समन्वय समितीशी संपर्क साधून बहुसंख्येने सहभागी व्हावे.आपल्या संघटनेचा बॅनर शिक्षक/शिक्षकेतर रॅलीच्या शीर्षस्थानी लावावा.तसेच रॅली चे फोटो महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाच्या ग्रुपवर माहिती व संदर्भासाठी फॉरवर्ड करावेत.तसेच आंदोलनास प्रसिद्धीमाध्यमातून प्रसिद्धी द्यावी.असे आवाहन करण्यात येत आहे असे ज्ञानेश्वर कानडे,अध्यक्ष महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन) यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

बोदवड तालुक्यात लंपीग्रस्त गावांची पशुसंवर्धन विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 20 मार्च 2024 !

March 20, 2024

धक्कादायक : किरकोळ वादातून मुलाने केला बापाचा खून !

September 28, 2020

Horoscope Today : राशीभविष्य, मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ !

November 29, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना न्यायालयाने ठोठवला दंड ; जाणून घ्या…नेमकं काय आहे प्रकरण !

June 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group