नाशिक (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. अचानक झालेल्या पावसामुळे सहा ते सात भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील साडे तीन शक्ती पिठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी असते. अशातच गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक गावातील संपर्क तुटला आहे. याचबरोबर सप्तश्रृंगी गावात अचानक झालेल्या ढगफुटीमुळे भाविकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. यामध्ये सहा ते सात भाविक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळतेय. मुसळधार पावसामुळे 7 नद्यांना पूर आले आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे.