जळगाव, दि. २३ प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खान्देश सेंट्रल येथे दि. २५ ते २८ जुलै २०२४ दरम्यान करण्यात आले आहे. या राज्य स्तरीय बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेला एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धेला जैन इरीगेशन सिस्टीम्स लि, जैन स्पोर्ट्स अकॅडमी व खान्देश सेंट्रल यांचे सहकार्य मिळणार आहे.
राज्य वरिष्ठ खुल्या गटासाठी स्पर्धेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून निवड चाचणीव्दारे निवडलेले चार बुध्दिबळ पटू या स्पर्धेत आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. तसेच ७, ९, ११, १३ व १५ वर्षे वयोगटा खालील स्पर्धेकांना सुद्धा यात सहभागी होता येईल. ही स्पर्धा स्विस लिग पध्दतीने एकुण आठ डावात खेळवली जाईल. आंतरराष्ट्रीय पंच गौरव रे (मुंबई) यांची स्पर्धसाठी मुख्य पंच म्हणून नियुक्ती केली आहे.
या स्पर्धेत एकूण ७२,००० हजाराची रोख पारितोषीके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला रोख रूपये १५,००० व चषक, द्वितीय क्रमांकासाठी रोख रूपये १३,००० व चषक, तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूला रूपये १०,००० व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यानंतर दहा क्रमांकापर्यंत रोख पोरीतोषिके दिली जाणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन २५ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता खान्देश सेंट्रल च्या सौ मधूभाभी जैन, यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी उद्योजक राजेंद्र मयूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन चे सर्व पदाधिकारी बुद्धिबळ प्रेमी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
आॕगस्ट महिन्यामध्ये गुडगाव [हरियाणा] येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड जळगावात होणाऱ्या या स्पर्धेतील सहभागी बुध्दिबळ पटूमधून केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील साधारणतः २५ जिल्हांमधून निवड झालेले १८० ते २०० खेळाडूंचा सहभाग या राज्यस्तरीय बुध्दिबळ अजिंक्य स्पर्धेत होईल.
पत्रकार परिषदेत महाराष्ट्र बुध्दिबळ असोसिएशन व जळगाव जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष फारूक शेख, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे व्हाईस प्रेसिडेंट, मिडीया चे अनिल जोशी, जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे उपाध्यक्ष शकील देशपांडे, सचिव नंदलाल गादिया, कोषाध्यक्ष अरविंद देशपांडे, सहसचिव चंद्रशेखर देशमुख, कार्यकारणी सदस्य तेजस तायडे, रविंद्र दशपुत्रे, विवेक दाणी आदी उपस्थित होते. बुध्दिबळाचे आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे, जैन स्पोटर्स ॲकडमीचे समन्वयक रविंद्र धर्माधिकारी यांच्यासह जैन स्पोर्ट्स चे सहकारी उपस्थित होते.
















