TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महात्मा गांधी हेच आजचे ‘युथ आयकॉन’: एम. राजकुमार !

गांधीतीर्थ येथून ग्राम संवाद सायकल यात्रेस प्रारंभ !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 30, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गांधीजींच्या जीवन चरित्राकडे व विचारांकडे डोळसपणे पाहिल्यास  आजच्या तरुणांसमोर महात्मा गांधी यांच्यासारखा दुसरा युथ आयकॉन नाही. त्यांच्या अंगी असलेला कणखरपणा व लोकनेत्यासाठीची योजकता आजच्या पिढीने अनुकरण करावी अशी आहे. असे मौलीक विचार जिल्हा पालीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधी पुण्यतिथीच्या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित ‘ग्राम संवाद सायकल यात्रे’च्या शुभारंगप्रसंगी उपस्थितांशी ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, डीन गीता धर्मपाल उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

सकाळी सात वाजता गांधी तीर्थच्या अॅम्फी थिएटर येथे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व उपस्थितांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पार्पण करण्यात आले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी सुरेश पाटील यांनी सर्वधर्म प्रार्थना व रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम हे भजन सादर केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी डॉ. अश्विन झाला यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी उपस्थितांना स्वच्छता व सद् भावना शपथ दिली.

उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार पुढे म्हणाले की, मला शालेय जीवनात महात्मा गांधीजींबद्दल अतिशय त्रोटक माहिती होती. मात्र महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या जीवनाबद्दल विस्तारानं अभ्यास केल्यानंतर त्यांची महत्ता कळली.  दक्षिण आफ्रिकेसारख्या नवख्या देशात त्याकाळी जाऊन काम करणे व तेथील प्रशासनाला अन्यायाला जाब विचारण्याचा कणखरपणा मला विशेष भावला. स्वातंत्र्य संग्रामतील त्यांचे योगदान मोलाचे होते. संवाद साधनांची मर्यादा असलेल्या त्याकाळात त्यांनी केलेली आंदोलने यशस्वी ठरली कारण हि आंदोलने वाऱ्यासारखी देशभर पसरत होती व त्यावर गांधीजींचे संपूर्ण नियंत्रण होते. त्यांच्या ठायी असलेले हे गुण अचंबित करणारे होते. गांधीतीर्थ येथील म्युझियमच्या माध्यमातून त्यांचे कार्य आजच्या युवापिढीपर्यंत त्यांच्या भाषेत व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे गांधी फाऊंडेशन पोहोचवत आहे ही चांगली बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमा नंतर लगेचच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्वतः राजकुमार आणि अशोक जैन यांनी काही अंतर स्वतः सायकल चालवून सहभागींना प्रोत्साहन दिले. तेरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत एकूण ३५ सायकल यात्रींचा सहभाग आहे.जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम भागातील जळगाव, एरंडोल, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यातून हि यात्रा मार्गस्थ होणार आहे. सुमारे ३५० कि.मी.चे एकूण अंतर असेल. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधला जाईल. या सायकल यात्रेत विविध राज्यातून येणारे व स्थानिक अशा ३० जणांचा सहभाग आहे. ९ वर्षाचा नीर झाला, ७८ वर्षीय अब्दुलभाई, अमेरिकेतील मारिया व बंगलोर येथील ३ विद्यार्थ्यांचा यात्रेत समावेश आहे.

यात्रेत दररोज दोन कार्यक्रम शाळा / महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष स्वरुपाने बनविलेली ऐतिहासिक प्रदर्शनी प्रत्येक ठिकाणी लावली जाणार आहे. तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी गावकऱ्यांसाठी जाहीर कार्यक्रम नियोजीत आहेत यात निरोगी व सशक्त समाजाच्या निर्मितीच्या उद्देशाने या यात्रेत प्रबोधन करण्यात येणार आहे. प्रश्नमंजुषा, व्याख्यान, खेळ, पथनाट्य व पपेट शोचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी उपस्थितांना याप्रसंगी स्वच्छता व सद् भावना शपथ देण्यात येईल. विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

August 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑगस्ट 2026 !

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 02 ते 08 ऑगस्ट 2026 !

August 2, 2026
Next Post

संजय राऊतांच्या धमक्यांमुळेच आमदार पळाले ; शिंदे गटाच्या लेखी उत्तरात खळबळजनक आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून ५ लाख रुपयांच्या नोटा गायब

July 13, 2021

कर्माचा हिशोब होईल, त्यावेळी काय करणार?; शिवसेनेचा मोदींवर निशाणा

December 22, 2020

२०५० मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला येईन; मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

December 22, 2020

आदित्य ठाकरे यांचे आपल्या मतदारसंघात स्वागत, पण ‘डंके की चोट पे’ सांगतो… : आ. किशोर पाटील !

August 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group