बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतमोजणी आज पार पाडली. मतमोजणी झालेल्या ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने वर्चस्वाचा दावा केला आहे. काँग्रेस आयचे युवक तालुकाध्यक्ष पुंजाजी पाटील कोल्हाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले असून त्यांनी पंचायत समिती उपसभापती रुपाली राणे यांचे पती जीवन राणे यांच्यासह इतर पाच उमेदवारांचा पराभव केला मात्र रुपाली राणे या सदस्यपदी निवडून आल्या आहेत.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल पुढील प्रमाणे चिचंखेड प्र.बो.लोकनियुक्त सरपंचपदी आक्काबाई नंदू पाटील या विजयी झाल्या तर सदस्य पदी अलकाबाई दांडगे, विकास नेमाडे, हे उमेदवार विजयी झाले याआधी वत्सलाबाई भिल्ल, विद्या नेमाडे, नंदकिशोर सुपे, प्रविण बारहाते हे सदस्य बिनविरोध झाले होते. निमखेड ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंच पदी रमेश सुरंगे तर सदस्य पदी भाऊराव सदाशिव पाटील, हे विजयी झाले याआधी मनोज शेळके, प्रतिभा पाटील, सविता पाटील, संगीता पाटील पंजाब वाघ,शोभाबाई वाघ हे बिनविरोध झाले होते.
वडजी ग्रामपंचायत मध्ये एकाच जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सदस्य पदी किरण खाचणे विजयी घोषित झाले तर लोकनियुक्त सरपंच पदी अलकाबाई खाचणे यांच्या सह सदस्य पदी दिलीप पाटील, शिव कन्या कासार, मनिषा पवार, संजय पाटील, मिनाबाई पाटील, सुनंदा भिल्ल हे सर्व बिनविरोध झाले होते. धोडखेडा ग्रामपंचायच्या सरपंच पदी वैशाली दांडगे या विजयी झाल्या तर सदस्य पदी संगिता माहोरे , विक्रमसिंग पाटील, उज्ज्वला पाटील, हे उमेदवार विजयी झाले तर ईश्वरसिग पाटील, सागर दांडगे, विजया दांडगे,रूपाली पाटील हे बिनविरोध झाले होते.
कोल्हाडी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच पदी काँग्रेस (आय) युवक तालुका अध्यक्ष पुजाजी पाटील, हे लोकनियुक्त सरपंच पदी विजयी झाले तर सदस्य पदी उमेश कवळकर , रिटा मोरे (ईश्वर चिठ्ठीने), योगिता शिंदे, दिपाली राणे, रमा मोरे,रेशमा सुर्यवंशी,केशव देशमुख, रूपाली लढे हे विजयी झाले या ग्रामपंचायत निवडणूकीत महा विकास आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाले असा दावा राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांनी केला आहे.