TheClearNews.Com
Tuesday, August 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

vijay waghmare by vijay waghmare
July 19, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – वीज ग्राहकांशी संवाद साधून स्मार्ट टीओडी मीटरबाबतचे गैरसमज दूर करून तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मंगळवारी (21 जुलै) जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये ग्राहक संवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये स्मार्ट मीटरचे फायदे, वैशिष्ट्ये, कार्यपद्धती आणि अचूकतेविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
स्मार्ट टीओडी मीटर हे पूर्णतः अचूक असून सामान्य वीज ग्राहकांसाठी फायदेशीर असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवसा वीज वापरावर प्रतियुनिट 85 पैशांची सवलत मिळविण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर उपयुक्त ठरत आहेत. औद्योगिक ग्राहकांकडे अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे मीटर वापरात असल्याने वीज ग्राहकांनी मेळाव्यांना उपस्थित राहून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.
जळगाव परिमंडलांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार मंडलातील सर्व उपविभाग कार्यालयांत मंगळवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत ग्राहक संवाद मेळावे पार पडणार आहेत. मेळाव्यांना संबंधित महावितरणचे कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकरी अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. तसेच स्मार्ट मीटर संदर्भात असलेल्या शंकेचे व वीज देयक तक्रारींची तपासणी करून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
परिमंडलातील 6 लाख 83 हजार ग्राहकांकडे स्मार्ट मीटर : जळगाव परिमंडलात आतापर्यंत एकूण 6 लाख 83 हजार 374 वीज ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. यामध्ये जळगाव मंडलात 4 लाख 34 हजार 957, धुळे मंडलात 1 लाख 52 हजार 308 आणि नंदुरबार मंडलात 96 हजार 109 ग्राहकांचा समावेश आहे. स्मार्ट मीटरचे फायदे व माहिती जाणून घेतल्यानंतर जळगाव परिमंडलात मोठ्या संख्येने वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवण्यास प्रतिसाद दिला आहे.
मेळाव्याशिवाय या ठिकाणी दाखल करता येणार तक्रारी : स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत किंवा कुठल्याही कारणाने आलेल्या वाढीव वीजबिलांबाबतच्या तक्रारींचे महावितरणकडून प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे. ग्राहकांनी महावितरणचे संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲप तसेच 1912, 19120. 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकांवर तक्रारी नोंदवाव्यात तसेच या संवाद मेळाव्याचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMahavitaran to hold customer interaction meets on Tuesday to address doubts regarding smart meters

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा निमगावात पोहोचली लालपरी !

August 10, 2024

एकही गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये ; गुलाबराव देवकर यांचे प्रतिपादन

December 6, 2021

चाळीसगावची जागा निवडून आणणे मोठी गोष्ट नाही : एकनाथराव खडसे

February 9, 2021

वऱ्हाडाची कार नदीत कोसळली ; नवरदेवासह नऊ जणांचा जागीच अंत

February 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group