जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणूकांसाठी भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तयारीला लागला असुन राज्यभरातील ३६ जिल्हयांमध्ये संयुक्तरित्या मित्र पक्षाचे जिल्हा समन्वयक तिघंही पक्षाने जाहिर केले आहे. याबाबतचे पत्र महायुतीचे समन्वयक आ. प्रसाद लाड यांनी जाहिर केले आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी तिघांची निवड !
जळगाव जिल्हयात भाजपातर्फे जिल्हा समन्वयक म्हणून आ. मंगेश चव्हाण, शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा समन्वयक म्हणून आमदार चिमणराव पाटील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांची वर्णी लागली आहे. महायुतीचे मित्र पक्ष व घटक पक्षांच्या ५ जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या समन्वय बैठकीत ठरल्या प्रमाणे राज्यभरात १४ जानेवारी रोजी महामेळावे होणार आहे. लोकसभा निवडणूकांसह आगामी निवडणूकांमध्ये मित्र पक्षांमध्ये जिल्हास्तरावर समन्वय राहावा यासाठी जिल्हा समन्वयक प्रमुखांची निवड करण्यात आली आहे.
समन्वयक घेणार स्थानिक पातळीवर बैठका !
जिल्हास्तरीय मित्र पक्ष समन्वय समिती सर्व मित्र पक्षाच्या स्थानिक नेत्यांची तातडीने बैठक ठेवून मेळाव्याचे नियोजन करणार आहे. जिल्ह्याच्या महत्वाच्या ठिकाणी हा मेळावा घेण्याच्या सुचना महायुतीचे समन्वयक आ. प्रसाद लाड यांनी पत्राव्दारे दिल्या आहे. या मेळाव्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री व सर्व मित्र पक्षाच्या नेत्यांना आमंत्रीत केले जाणार असुन या मेळाव्यांच्या माध्यमातून ‘मिशन लोकसभा निवडणूकांची रणशिंग फुंकली जाणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
जिल्हास्तरावर होणार मेळावे राज्यभरात ३६ जिल्हयांमध्ये १४ !
जानेवारीला मित्र पक्षांचे संयुक्त मेळावे होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक संयुक्त मेळावा या माध्यमातून होणार आहे. भाजपाने नेमलेले हे २६ समन्वयक आपआपल्या जिल्ह्यात मेळाव्याचे प्रमुख समन्वय करतील जिल्हास्तरावर २५०० ते ३००० हजार कार्यकर्त्याचा म्हणजेच प्रत्येक पक्षाचे ७०० ते ८०० प्रमुख पदाधिकारी या मेळाव्यात राहणार आहे. या मेळाव्ळात महिला व युवा पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश राहणार आहे.