मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला शुक्रवारी ‘ट्विटर’ कडून मोठा दणका बसला. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नसला तरी त्याच्या फॉलोअर्सची संख्या ही ८२ लाखांच्या घरात आहे. पण, काल ट्विटरनं उचललेल्या एका पाऊलमुळे सोशल मीडियावर धोनीचीच चर्चा सुरू झाली. या चर्चेनंतर ट्विटरनं धोनीच्या अकाउंटची ब्लू टिक त्याला परत केली आहे.
काल (शुक्रवारी) दुपारी ट्विटरनं एमएस धोनीच्या ट्विटर अकाउंटवरुन ब्ल्यू टिक काढून टाकली होती. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. धोनीच्या चाहत्यांनी ट्विटला अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अशातच अनेकांनी असा अंदाज वर्तवला की, महेंद्रसिंह धोनी ट्विटरवर कमी अॅक्टिव्ह असतो, त्यामुळं ट्विटरनं ब्लू टिक काढली असावी. पण, ट्विटरनं धोनीच्या अकाउंटची ब्लू टिक त्याला परत केली आहे. जरी धोनी ट्विटरवर जास्त अॅक्टिव्ह नसला तरी, त्याचे जवळपास ८.२ मिनियन फॉलोअर्स आहेत.
दरम्यान, मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने महेंद्र सिंह धोनीच्या ट्विटर हँडलवरील व्हेरीफिकेशन मार्क म्हणजेच ब्लू टिक काढून घेतली होती. यापूर्वीही ट्विटरने अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींची ब्लू टिक काढून घेतली आहे. काही काळानंतर ब्लू टिक पुन्हा पूर्वरत करण्यात आली आहे.