कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथून जवळच असलेले वनकुठे येथील हेश दोधू पाटील यांची कृषी पदवीधर संघटना एरंडोलच्या युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, कृषिभूषण महेश कडूस पाटील व अध्यक्षा मंगल कडूस पाटील यांनी महेश पाटील यांची निवड केली. कृषी पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरज खोमणे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मनीष भदाणे, युवकचे कार्याध्यक्ष राहुल राजपूत व जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष फकीरचंद पाटील यांनी महेश पाटील यांचे निवडीबद्दल कौतुक केले. तसेच एरंडोल तालुक्यातील सर्व तरुण मित्रांनी महेश पाटील यांचे अभिनंदन केले.