मुंबई (वृत्तसंस्था) देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यात अटीतटीची लढतीमध्ये ममता बॅनर्जी यांनी मैदान मारलं आहे. एकेकाळचे सहकारी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचा त्यांनी जवळपास ३७२७ मतांनी पराभव केला आहे. नंदिग्रामच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला आहे.
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या कलावरून सध्या तृणमूल काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असंच दिसतंय. पण नंदीग्राममध्ये मात्र सुरुवातीपासूनच अटीतटीची लढाई सुरु आहे. सुरुवातीला भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी ममतांना पिछाडीवर टाकत मोठी आघाडी घेतली होती. नंतर काही वेळाने ममता दीदींनी पुन्हा कम बॅक करत २७०० मतांची आघाडी घेतली. पण ही आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. नंतर लगेचच सुवेंदू अधिकारी पुन्हा एकदा आघाडीवर गेले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आठ हजार मतांची आघाडी घेतली आहे. नंदीग्राममधील मतमोजणीमुळे क्षणाक्षणाला अनेकांचा काळजाचा ठोका चुकत आहे.
नंदीग्राममध्ये नंदीग्राम एक आणि नंदीग्राम दोन असे भाग पडतात. पहिल्या भागात सुवेंदू अधिकारी आघाडीवर होते तर आता दुसऱ्या भागातील मतमोजणी सुरू झाल्यानंतर ममतादीदींनी आघाडी घेत विजय मिळवला आहे.