जळगाव (प्रतिनिधी) मनपा शिक्षण मंडळ व रेडियन्स फाऊंडेशन चे संयुक्त विद्यामानाने हाजी इब्राहीम रानानी मनपा उर्दू शाळा क्र.३६/५६ मेहरुन जळगाव प्रथमच उर्दू मनपा शाळेत बुद्धीबळ स्पर्धा – १२० खेळाडूंचा समावेश येथे मनपा उर्दू शाळा बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत मनपा शाळांचे एकूण १२० बुद्धीबळपटुंनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत १० व १२ वर्षाखालील मुले आणि मुलींचे चार स्वतंत्र गट होते. स्पर्धेत प्रथम ते पंचम स्थान प्राप्त करणारे खेळाडूंना मा. इब्राहिम पटेल यांच्या तर्फे ट्रॉफी व शैक्षणिक साहित्य देऊन गौरवांकित करण्यात आले.
चेस इन स्कूल प्रोजेक्ट सुरू करणार – शेख
अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन ,जळगाव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या नेतृत्वात मनपा उर्दू शाळा मध्ये सुध्धा चेस इन स्कूल हा प्रोजेक्ट सुरू करण्याची घोषणा महाराष्ट्र संघटनेचे उपाध्यक्ष फारूक शेख यांनी घोषित केली.
पारितोषिक वितरण प्रमुख अतिथी
पारितोषिक वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष फारुक शेख तर प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक श्री.इब्राहीम पटेल, समस्त मेमन बिरादरी चे कादर कच्ची, आणि रेडियन्स फाऊंडेशन चे अध्यक्ष इस्माईल पटेल व स्पर्धेचे मुख्य पंच प्रवीण ठाकरे होते.
सर्व मान्यवरांचे स्वागत केंद्र प्रमुख डॉ. कुरबान खान तडवी यांचे हस्ते करण्यात
★१० वर्षांखालील मुले गट
१) जकरिया खाटिक – मनपा ५६
२) हम्माद खान – मनपा ४१
३) मावेज मंसुरी – मनपा ५६
४) अफ्फान कुरेशी – मनपा ४१
५) मोहम्मद अली – मनपा ५६
★१० वर्षाखालील मुलीगट
१) इनाया शेख – मनपा १०
२) माहिन बागवान – मनपा ५६
३) माहेरा शेख – मनपा ५६
४) आलेमिन शेख – मनपा ५६
५) सादिया शेख – मनपा ५६
★१२ वर्षाखालील मुले गट
१) यहया खाटिक – मनपा ३६
२) शाहिद शेख – मनपा ३६
३) राशिद खान – मनपा ३६
४) मोहम्मद हस्सान – मनपा ३६
५) मोहम्मद सैफ – मनपा १०
★१२ वर्षांखालील गट
१) अशमिजान शेख – मनपा ३६
२) जूनेरा शेख – मनपा ३६
३) ऐमन शेख – मनपा ३६
४) आलिया खान – मनपा ३६
५) शिफा चौधरी – मनपा ३६
★ शिक्षक गट
१) इमरान खाटिक सर – मनपा -१०
स्पर्धा याश्र्वितेसाठी नईमुद्दिन सर, इम्रान सर, हिदायत सर, अजहर सर, शकील सर, अर्शी मिस, अजकिया मिस, निकहत मिस,शाईस्ता मिस, शाकीर सर, अफसर सर, सनिया मिस, रेहान सर, अजीम सर, अय्युब सर, नासीर सर यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकील सरांनी तर अर्शी मिसने आभार व्यक्त केले.