बोदवड (प्रतिनिधी) येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटक नगराध्यक्ष आनंदा पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव हे होते.
यावेळी नगरसेवक राजेशभाऊ नानवाणी, रामदास पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष भारत पाटील संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत वाघ, संजय पाटील, संजय वराडे ,डॉ. प्रशांत बडगुजर, मयूर बडगुजर हे उपस्थित होते. मॅरेथॉन प्रथम बक्षीस ट्रॉफी मुली- श्विनी नामदेव काटोले (शिरसोली), जळगाव द्वितीय क्रमांक ट्रॉफी जानवी संजय रोझोदे (जळगाव), तृतीय क्रमांक ट्रॉफी रंजना अशोक सुरवाडे (जळगाव)
तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक ट्रॉफी सुनील रामदास बारेला (जळगाव) ,द्वितीय क्रमांक ट्रॉफी सचिन सावंत राठोड (पळसखेडा ,बोदवड) तृतीय बक्षीस ट्रॉफी जयेश विलास पाटील (जळगाव) यावेळी सर्वच स्पर्धकांना बक्षीस ट्रॉफी रोख रक्कम देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेबांनी मुलांना पोलीस भरती संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये मुले एकूण सहभाग मुले 110 व मुली 50 एकूण सहभाग 160 मुला मुलींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक वर्ग शिक्षक निकम सर,पाटील सर, मोजे सर, भोईसर, मंगलकर सर व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती ग्रुप तालुका अध्यक्ष शैलेश वराडे, गणेश मुलांडे, गणेश सोनवणे, दीपक खराडे, राजेंद्र वराडे, गोपाल पाटील यांनी परिश्रम घेतले.