चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २८ वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस स्थानकात जितेंद्र अशोक सोनार (रा. पिंप्राळा, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. २२ मे २०२२ सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जितेंद्र अशोक सोनार याने एका २८ वर्षीय विवाहित महिलेला घरात एकटे असल्याचा फायदा घेत घरात येऊन ओढतान करत अश्लील शिवीगाळ केली. तसेच महिलेच्या मनास लज्जा उत्पन होईल असे कृत्य करुन हातातील बांगड्या फोडून नुकसान केले. याप्रकरणी चोपडा पोलीस स्थानकात जितेंद्र सोनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. हेमंत कोळी हे करीत आहेत.