नशिराबाद (प्रतिनिधी) अपशकुनी म्हणून शेअर मार्केटच्या व्यवसायातील कर्ज फेडण्याकरिता माहेरून २५ लाख रुपये आणण्यासाठी २१ वर्षीय विवाहितेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात हिमाली शैलेन्द्र सूर्यवंशी (वय २१, रा. पुष्पम टेनामेन्ट गोत्री वडोदरा राज्य गुजरात ह.मु. तरसोद ता.जि. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शैलेंद्र शालिग्राम सूर्यवंशी (पती), रत्ना शालिग्राम सूर्यवंशी (सासू), शालिग्राम रामराव सुर्यवंशी (सासरे), मोनल भुषण पाटील (ननंद), भुषण पाटील (नंदुरी रा. वडोदरा), सोनल जितेंद्र पाटील (ननंद सर्व राहणार वडोदरा राज्य गुजरात) या सासरचे लोकांनी हिमाली ही अपशकुनी आहे. तिचे लग्नात तिचे नंदोई भुषण पाटील याचा पाय मोडुन फाँक्चर झाला होता. तसेच हिमालीचे पती शैलेश सुर्यवंशी यांच्यावर शेअर मार्केटच्या व्यवसायात २५ लाख रुपये कर्ज फेडण्याकरीता माहेरुन २५ लाख रुपये आणावे, या कारणावरुन विवाहितेला वेळोवेळी शिवीगाळ करुन मारहाण करुन जिवे ठार मारण्याच्या धमकी देत मानसिक व शारीरीक छळ केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भास्करराव साळुंके हे करीत आहेत.