पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) परिसरातील एका गावातील महिलेचा शेतीच्या वादातून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजी शंकर पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, शेतातील बांधामुळे माझ्या शेतात पाणी येत नाहीय. त्यावर पिडीत पिडीतेने सांगितले की, पाणी जात असेल तर मी काही करु शकत नाही. याचा राग आल्यामुळे संशयित आरोपी शिवाजी पाटील याने पिडीतेस शिवीगाळ करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच चापटाबुक्यांनी व त्याच्या हातातील काठीने मारहाण केली. एवढेच नव्हे तर, तुला विहिरीत ढकलून मारुन टाकेल अशी धमकी दिली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहकॉ अर्जुन महाजन हे करीत आहेत.