कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथून जवळच असलेले आडगाव येथील तीन हुतात्मा शहिद व ३० स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ग्रामपंचायत व हुतात्मा स्मारक येथे ध्वजारोहण करण्यात आले.
हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र सैनिक वारसदार महारू महाजन यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतच्यावतीने कोरोना काळात कार्य केलेले सामाजिक कायकर्ते, पत्रकार, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका आदींना कोरोना योध्दा म्हणून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. एसएससी बोर्डात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांने यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व आकर्षक पेन देऊन सत्कार करण्यात आला. तसेच हुतात्मा स्मारक येथे वृक्षरोपण करण्यात आले.
यावेळी अंगणवाडीस दोन पाण्याच्या टाक्या नामदेव पाटील यांनी दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र सैनिक वारसदार व समाजसेवक नामदेव कौतीक पाटील होते. यावेळी एरंडोलचे नायब तहसिलदार सुरेश शिरसाट, सरपंच सुनिल भिल, उपसरपंच दिलीप बापू पवार, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, वारसदार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. यावेळी प्रमोद पाटील चिलाणेकर, महेश चौधरी, नामदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन ग्रा प सदस्य प्रल्हाद पाटील यांनी केले. शेवटी आभार उपसरपंच दिलीप पवार यांनी मानले. यावेळी मानवंदना देण्यासाठी बहुसंख्य लोक उपस्थित होते.