TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

११ मे ‘महात्मा दिन’ म्हणून देशभरात साजरा करावा ; श्री संत सावता माळी युवक संघाचे विनायक महाजन यांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) महात्मा जोतिराव फुले यांना महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने ११ मे १८८८ रोजी “महात्मा” ही पदवी प्रदान केली होती. त्यावेळेपासून देश त्यांना महात्मा म्हणून ओळखू लागला आहे. त्यामुळे हा दिवस राज्य सरकारने ‘महात्मा दिन’ या नावाने साजरा करण्याची मागणी श्री संत सावता माळी युवक संघाचे अध्यक्ष सचिन गुलदगड यांच्या आदेशानुसार विभागीय संघटक विनायक महाजन यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

महात्मा फुले यांचे कार्य जगाला सर्वश्रुतच आहे. स्त्री-शुद्र-अतीशुद्र समाजाच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले व जोतीबा फुले ज्या तन्मयतेने झटत होते. त्यासाठी त्यांनी जे कष्ट उपसले होते. मांडवीच्या रघुनाथ सभागृहात आपल्या उद्धारकर्त्या महामानवाचे ऋण फेडण्यासाठी गरीब व कष्टकरी जनतेने मोठ्या संख्येने आणि उत्स्फुर्तपणे जमून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विडा उचलला होता. मुंबईकर सत्यशोधक कार्यकर्ते व नारायण मेघाजी लोखंडे यांच्या आमंत्रणांवरुन जोतीबा फुले मुंबईला आले होते. तेव्हा मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेच्या वतीने ११ मे १८८८ रोजी जोतीबा फुलेंना युगप्रवर्तक कार्याबद्दल ‘महात्मा’ पदवीने गौरविण्यात आले. त्यादिवसापासून सर्वांना जोतीबा फुले ‘महात्मा फुले’ नावाने परिचित झालेत.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

११ मे २०२३ रोजी त्या घटनेस १३५ वर्षे पुर्ण होत आहेत. या घटनेचा वेध घेऊन श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्य या संघटनेने देशभर सलग ८ वर्ष विविध उपक्रम घेऊन हा विशेष दिन साजरा केला. तसेच या दिवसास ‘महात्मा दिन’ असे नाव दिले. महात्मा फुले नावाने प्रसिद्ध व परिचित असलेले जोतीराव ऊर्फ जोतीबा गोविंदराव फुले हे मराठी लेखक,विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना ११ मे इ.स.१८८८ या साली मिळाली,त्यामुळेच ११ मे या दिवसाला महत्व प्राप्त झाले असुन ११ मे रोजी ‘महात्मा दिन’ म्हणुन साजरा करण्यात यावा,असे आवाहन विभागीय संघटक विनायक महाजन यांनी श्री संत सावता माळी युवक संघाच्या पदाधिकार्यांना व समस्त फुलेप्रेमींना केले आहे. आगामी ११ मे रोजी या मागणीसाठी राज्यशासन,जिल्हाधिकारी,तहसीलदार,आदी पातळीवर निवेदने देऊन सरकारला हा ‘महात्मा दिन’ साजरा करण्यासाठी दबाव तयार करावा लागेल. त्यांच्या कार्याला ती आदरांजली ठरेल, असेही संघटनेचे विभागीय संघटक विनायक महाजन यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
Next Post

साहेब निर्णय मागे घ्या, अन्यथा... ; आमदार अनिल पाटलांचा थेट राजीनाम्याचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. मंगेश चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन ; कन्नड घाटात पोलिस करत होते पैशांची मागणी !

November 25, 2021

नांदुरा तालुक्यातील विकास कामांचा अनुशेष भरून काढू : श्रीराम पाटील !

May 5, 2024

अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडले ; काका-पुतण्यासह तिघे जागीच ठार !

December 31, 2023

राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाण्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद : ना. पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group