जळगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जळगाव महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने गुरूवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस महापौर जयश्री सुनील महाजन यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.
गुरुवार ११ ऑगस्ट रोजी जळगाव महापालिकेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६.३० वाजता महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते मॅरेथॉन रॅलीला झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीत मनपा आयुक्त विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, आरोग्य अधिकारी अभिजीत बाविस्कर, उपायुक्त प्रशांत पाटील, लेखा अधिकारी चंद्रकांत वानखेडे, नगरसचिव सुनील गोराणे, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, सर्व प्रभाग अधिकारी व जळगाव रनर्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य व मनपाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीत सहभागी सर्व क्रीडाप्रेमी व स्पर्धकांना महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.