जळगाव (प्रतिनिधी) शहरात महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सोमवारपासून महास्वच्छता अभियान सुरू केले आहे. बुधवारी एसएमआयटी कॉलेज रस्त्यावर पाहणी करताना मुख्य गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून मनपा अधिकारी गुणवत्ता तपासत नसल्याने महापौरांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
गटारीचे काम इतके निकृष्ट असून एक लाथ मारली तरी भिंत पडेल. नाल्याचा आकार एका रेषेत नसून नागमोडी झाला आहे. आजच तुम्ही लक्ष देत नाही तर पुढे कशी दुरुस्ती होणार अशा शब्दात महापौर सौ. भारती सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.