जळगाव (प्रतिनिधी) शनिवार दि. २८ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील ड्रायव्हिंग संचालकांचा जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन श्री क्षेत्र पद्मालय ता. एरंडोल येथे करण्यात आले आहे.
संचालकांचा तालुका निहाय आढावा, तालुका निहाय पद नियुक्ती, ड्रायव्हींग स्कूल संचालकांना येणाऱ्या अडचणी, व्यवसायात होणारे नवीन बदल, नवीन परिवहन नियमावली, व्यवसायात नाविन्यपूर्णता, एक सारखे प्रशिक्षण शुल्क याबाबत मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अँड. जमील देशपांडे व धुळे-नंदूरबार जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील चौधरी मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी या मेळाव्याला मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव किरण अडकमोल यांनी केले आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विविध विषयावर चर्चा होणार आहे. दरम्यान मेळाव्यानंतर एरंडोल येथील साई मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुनील पाटील यांच्यातर्फे खास खान्देशी जेवण- दाळ बट्टी, वांग्याची भाजी अशा सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व संचालकांनी सोबत आधार कार्ड,पॅन कार्ड,ड्रायव्हिंग स्कूल नमुना ८ या कागदपत्रांची झेरॉक्स, दोन पासपोर्ट साईझ फोटो सोबत आणावे. मेळावा वेळेवर सुरू होईल.