जळगाव (प्रतिनिधी) उड्डाणपूल ,प्रभात चौकातील दुरुस्ती तसेच मेजर व मायनर जंक्शन बाबत ठराव करून व सदर सुधारित ९ किलोमीटरचा डीपीआर तयार करून तो राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य कार्यालयास त्वरित सादर करावा असे ठरले होते. परंतु आज पूर्ण ८ महिने झाल्यानंतर फक्त प्रभात चौकच्या डीजाईनमध्ये सुधार करण्यात आला आहे. परंतु ‘२ पास-वे’ चे सुधारित प्रस्ताव अद्याप सादर केलेले नाही. मील्लत नगर व अग्रवाल चौक सुधारित डीपीआर का सादर करण्यात आला नाही?, याबाबत मेहरून वासीयांनी आज जळगावी दौऱ्यावर आलेले विभागीय आयुक्त नाशिक यांना साकडे घालून आर्त हाक दिली.
एकच पासवे चे प्रस्ताव का सादर केले
आज बुधवार रोजी दैनिक लोकमत ला फक्त शिव कॉलनी उड्डाणपूल विस्तारासाठी प्रस्ताव सादर या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी महामार्ग कृती समितीचे नगरसेवक रियाज बागवान यांच्याशी चर्चा करून हा एक प्रकारे मेहरून वासीयांसोबत नव्हे तर जळगाव करा सोबत अन्याय होत असल्याने याबाबत त्वरित शासनाला वेळेवर जागे करावे लागेल अन्यथा आपल्या कुटुंबियांवर कायमस्वरूपी झोपण्याची वेळ येईल म्हणून जळगाव येथे कार्यालयीन कामासाठी आलेले विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली. आयुक्त गमे साहेबाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी हा विषय सविस्तरपणे चर्चा केली असता त्यांनीसुद्धा याप्रकरणी महा मार्गाच्या विभागीय कार्यालयाशी त्वरित बोलून यातून मार्ग काढतो असे आश्वासन दिले.यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत सुद्धा उपस्थित होते. या शिष्टमंडळात फारुक शेख सह ॲडव्होकेट इमरान शेख, एडवोकेट आमीर शेख, दानिश सय्यद व अनिस शाह यांची उपस्थिती होती.
चेंज ऑफ स्कोप खाली सात कोटी रुपयाची तरतूद
नऊ किलोमीटर चौपदरी चा रस्ता हा एकूण ७० कोटी रुपयाच्या कार्य आदेश ने निघालेला असून त्यापैकी दहा टक्के रक्कम ही चेंज ऑफ स्कोप म्हणून वापरता येते त्यामुळेच खासदार उन्मेश पाटील यांनी सात कोटी रुपयांची तरतूद या तीन उड्डाणपुलासाठी करण्याचे निर्देश दिलेले होते परंतु त्या सात कोटी पैकी फक्त शिव कॉलनी उड्डाणपुलासाठी साडेचार कोटी रुपयाचा सुधारित डीपीआर जळगाव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी सह नागपूर येथे पाठवल्याचे दिसून येते.
तीव्र आंदोलन अथवा कायदेशीर लढा-मागणी
सात दिवसात मिल्लत नगर चा पास वे चा सुधारित प्रस्ताव न पाठवल्यास त्रिव स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल तसेच कायदेशीर लढा लढू अशी मागणी तीन पानी दिलेल्या निवेदनात केलेली आहे. या निवेदनाच्या प्रती माननीय खासदार उन्मेष पाटील, माननीय महापौर भारतीताई सोनवणे माननीय आमदार सुरेश भोळे ,माननीय जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत, माननीय पोलीस अधीक्षक जळगाव व प्रोजेक्ट डायरेक्टर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.