जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तांबापुरा-फुकटपुरा झोपडपट्टीत बंदघरे फोडून चोऱ्या करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पेलिसांनी अटक केली आहे. अटकेतील फिरोज शेख इक्बाल शेख (वय-२२) असे चोरी करणाऱ्या भामट्याचे नाव आहे. हा चोरटा परिसरातच बिस्मील्ला चौकात राहत असून अनेक दिवसांपासुन पोलिस त्याचा शोध घेत होती. आज त्याचा ठावठिकाणा लागल्यावर त्याला पोलीस पथकांनी अटक करण्यात आली.
तक्रारदार मोहसीन शेख सलिम (वय-२४रा. तांबापुरा) हे मोलमजुरी करुन कुटूंबीयांचा उदनिर्वाह चालवतात. रविवार (दि. १०) जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुटूंबीयांसह खालच्या मजल्यावर झोपले असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या वरच्या मजल्यावर शिरुन कडीकोयंडा तोडत २५ हजार रोक लंपास केले होते. या प्रकरणी एमआयडीसी पेलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. याच रात्री संशयीतांने तांबापुर परिसरात चार ते पाच ठिकाणी सलग घरफोड्या चोऱ्या करुन मुद्देमाल लंपास केला. शहरातील तांबापुरा-फुकटपुरा झोपडपट्टीत बंदघरे फोडून चोऱ्या करणाऱ्या तरुणाला अनेक दिवसांपासुन पोलिस त्याचा शोध घेत होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना गुप्त बातमीदाराने कळवले की, अट्टल गुन्हेगार फिरोज शेख घरफोडीच्या रात्री पासुन गायब असून त्यानेच गुन्हे केल्यचा संशय बळावल्याने उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील आनंद सिंग पाटील, सुधीर साळवे, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील सचिन पाटील आदींच्या पथकाने संशयीताला अटक करुन आज न्यायालयात हजर केले. न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. तपास पोलिस नाईक जितेंद्र राजपुत करीत आहेत.