जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसी हद्दीतील जी २० सेक्टर भोलेनाथ नावाच्या कंपनीत चोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी भोपाळ येथून अटक केली आहे. भिमकुमार परमहंश यादव (रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शहरातील एमआयडीसी हद्दीतील जी २० सेक्टर भोलेनाथ नावाच्या कंपनीत अज्ञात इसमाने कंपनीत आत प्रवेश करुन दिनांक ०९/०२/२०२२ रात्री ११.३० वा ते दिनांक १०/०२/२०२२ चे सकाळी ०९.०० वाजेच्या दरम्यान गोडावुनचे कुलूप तोडुन आत प्रवेश करत तसेच ऑफिसमध्ये घुसून लॉकरचे कुलूप तोडुन १ लाख ५२ हजार रुपये व ५०० रुपये किंमतीचा मोबाईल फोन चोरुन नेला. याप्रकरणी अमर दयालदास कटियारा (वय ४२ रा. सिंधी कॉलनी, नानक नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात कंपनीत काम करणाऱ्या कामगार यांना विचारपूस करण्यात आली होती. कंपनीत काम करणारे बरेच कामगार परप्रांतीय होते. कामगारांच्या चौकशीत सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांना माहिती मिळाली की, कंपनीत यापूर्वी काम करणारा भिमकुमार परमहंश यादव (रा. बिहार) यास चोरी करण्याची सवय असून तो यापूर्वी सदर कंपनीत काम करत होता व बऱ्याच दिवसापासून काम सोडून गेला होता व तो जळगाव येथे आल्याबाबतची माहिती मिळाल्याने व त्याने सदरची चोरी केल्याची खात्रीशीर माहिती होती. तो भोपाळ येथे चोरी करून गेला असल्याबाबतची माहीती मिळाल्याने पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी तात्काळ पोना हेमंत कळसकर, पोना सुधीर साळवे, पोकॉ चंद्रकांत पाटील यांना सदर संशयीत इसमाचा तपास कामी भोपाळ येथे रवाना केले होते. तपास पथकाने पुजा कॉलनी भोपाळ येथून ताब्यात घेतले. त्याची विचारपुस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली असून गुन्हयातील घरफोडीची रक्कम १,५२,००० रुपये हे घरी पाठविले असल्याचे सांगीतले आहे.
१२ तासांत आरोपीला केली अटक
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बारा तासात आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी गोपाळ येथून ताब्यात घेतले. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलिस कस्टडी रिमांड दिली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे रतिलाल पवार करीत आहे.
















