पाचोरा (प्रतिनिधी) पत्नी गर्भवती असल्याचे माहित असूनही तिच्या पोटावर मारहाण केल्यामुळे पत्नीचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात आफरीनखान जाकीर खान (वय ३१)रा. गुरुदत्त कॉलनी पाचोरा) या विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारीत्र्यावर संशय घेत पती जाकीर खान रसूल खानने २४ मे च्या रात्री हाथाबुक्क्यानी, लाथांनी व उजव्या पायाचा गुडघ्याने बेदम मारहान केली. त्यात विवाहितेला रक्तश्राव सुरू झाला. यानंतर उपचारादरम्यान विवाहितेचा गर्भपात झाला. एवढेच नव्हे तर जाकीर खानने आपल्या दोघं मुलांना देखील मारहान केली. याप्रकरणी पती जाकीर खान रसूल खान, जेठ अल्ताफ खान रसूल खान, जेठानी शबनम खान अल्ताफ खान (सर्व रा.पाचोरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप निरीक्षक विजया वसावे ह्या करीत आहेत.